Cable Internet vs  Satellite internet: 
भारतामध्ये लवकरच सॅटेलाईट इंटरनेटची सुविधा येण्याची शक्यता आहे . हे सॅटेलाईट इंटरनेट वायर किवा टॉवर याशिवाय आपल्या मोबाईलला इंटरनेट सुविधा देईल.
Internet and calls will continue even when there is no network thanks to Starlink

header ads
रिलायन्स जिओच्या सॅटेलाइट आर्म आणि वनवेबला दुरसंचार विभागाने थेट प्रात्यक्षिकासाठी मंजुरी दिल्याची माहिती मिळत आहे. चला तर आजच्या लेखात जाणून घेऊ नॉर्मल इंटरनेट अथवा केबलद्वारे मिळणाऱ्या इंटरनेटच्या तुलनेमध्ये सॅटेलाइट इंटरनेट कसे भारी आहे. सॅटेलाईट इंटरनेट हे 5G इंटरनेट पेक्षा वेगवान आणि चांगले आहे का? या इंटरनेटचे फायदे तोटे ही सर्व माहिती आज जाणून घेऊ.

भारतामध्ये अलीकडे Amazon या कंपनीने DOT कडे सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. सॅटेलाइट इंटरनेटच्या शर्यतीत Amazon, Jio, OneWeb आणि Elon Musk यांची कंपनी Starlink उतरली आहे.

सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे नेमक काय ओ? : What is the Satellite Internet?

header ads

आपण जसे आता TV सॅटेलाईट द्वारे बरेच चॅनेल पाहतो . आपण घरावर डिश बसवुन घरात TV वापरतो सेम त्याच पद्धतीने हे इंटरनेट सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आपल्या घरावर जमिनीवर बसवलेल्या दिशमध्ये उपग्रहाच्या मदतीने इंटरनेट प्रोव्हाईड केले जाईल नंतर मॉडेमच्या मदतीने तुम्हाला इंटरनेट आपल्या मोबाईल टीव्ही कॉम्पुटर वर मिळेल. यामध्ये इंटरनेट रेडिओ लहरींचा उपयोग करून देण्यात येतो. सॅटेलाइट इंटरनेटसाठी, तुम्हाला डिश किंवा डिव्हाइस प्रदान केले जाईल, ज्याद्वारे तुम्ही थेट वायरलेस पद्धतीने नेटवर्क प्राप्त करण्यास सक्षम असाल. तारांची गरज भासणार नाही.