बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षेत असलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा सोमवारी एका कार्यक्रमांमध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. 2023 मधील शिक्षक भरतीसाठी सर्व व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर उपलब्ध करून दिले आहे. 
शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 ही परीक्षा 22 फेब्रुवारी पासून 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती त्यानंतर उमेदवारांना सेल्फ सर्टिफाय करायचे सुविधा देखील देण्यात आली होती. याद्वारे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा यामध्ये संगणकीय प्रणाली द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पद भरती करण्यात येणार आहे.
header ads

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये 2 लाख 39 हजार 730 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 16,443 उमेदवारांनी ही परीक्षा प्रत्यक्षात दिलेली आहे. तर 1 लाख 62 हजार 562 उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे. 

2023 मध्ये होणाऱ्या शिक्षक पद भरतीसाठी सर्व व्यवस्थापनांना जाहिरात देता यावी यासाठी सुविधा पवित्र पोर्टलवर देण्यात आलेली आहे त्यासाठी आवश्यक असणारे युजर मॅन्युअल पवित्र पोर्टलवर उपलब्ध झाले असून सद्यस्थितीत महाराष्ट्रातील 23 जिल्हा परिषदांची बिंदू नामावली प्रमाणे झाले आहे. इतर जिल्हा परिषदांची बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर देखील लवकरच उपलब्ध होणार असून शिक्षकांची पदे भरण्यासाठी व्यवस्थापनांनी रोस्टर अद्यावत करणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
header ads

'TAIT 2022' या चाचणीनुसार शिक्षक पदभरतीची जाहिरात देण्यासाठी व्यवस्थापनांनी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच पोर्टलवरील 'युजर मॅन्युअल' नुसार कार्यवाही करावी. याबाबत व्यवस्थापनांना अडचण असल्यास ‘edupavitra2022@gmail.com' या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.