World Cup 2023 Ind vs Eng: वर्ल्ड कप 2023 सुरू होण्यापासूनच मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यापैकी कोणते दोन गोलंदाज टीम मध्ये घ्यायचे? हा प्रश्न टीम इंडियासमोर पडला होता. आत्तापर्यंत टीम इंडियाच्या पाच मॅच झाले असून या पाची मॅच मध्ये इंडियाच्या संघाने जबरदस्त प्रदर्शन करत आपली विजयी घोडदौड चालू ठेवली आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये बांगलादेश विरुद्ध च्या मॅच मध्ये ऑलराऊंडर असलेला हार्दिक पंड्या ला दुखापत झाली त्यामुळे टीम इंडियासमोर प्रश्न निर्माण झाले आहेत.
22 ऑक्टोंबरला न्यूझीलंड या संघासोबत खेळल्यानंतर टीम इंडियाला सहा दिवसांचा ब्रेक मिळालेला आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पुढील सामना इंग्लंड सोबत असणार आहे. या मॅच मध्ये टीम इंडियाचे Playing XI कोण असणार याकडे आता भारतीय चाहत्यांचे लक्ष लागले आहे. धर्मशाला येथे 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या न्युझीलँड विरुद्ध मॅच मध्ये हार्दिक पांड्या खेळू शकला नव्हता. आता लखनऊ येथे 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध भारताचा सामना होणार आहे. तर हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) दोन आठवडे बरे होण्यासाठी लागणार आहेत त्यामुळे इंग्लंड विरुद्ध च्या मॅचला india Playing 11 निवडताना कॅप्टन रोहित शर्मा आणि मुख्य कोच असलेले राहुल द्रविड यांच्यापुढे आव्हान असणार आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि मुख्य कोच असलेले राहुल द्रविड यांना प्रश्न आहे मोहम्मद शमी की मोहम्मद सिराज?

2023 Cricket World Cup सुरू होण्यापूर्वीपासूनच हा प्रश्न उभा होता जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सोबत दुसरा आणि तिसरा पेपर बॉलर कोण असणार आहे? यामध्ये शार्दुल ठाकूर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज(m siraj) या तीन जणांची नावे समोर होती. पहिल्या चार सामन्यांमध्ये मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर या दोघांना संधी मिळाली. या दोघांचा हा पहिलाच वर्ल्ड कप असून अष्टपैलू गोलंदाज मोहम्मद शमीला बेंचवर बसावे लागले. मात्र हार्दिक पंड्याला दुखापत झाल्यापासून मोहम्मद शमीला त्याच्या जागी निवडण्यात आली आहे. 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध च्या मॅच मध्ये मोहम्मद शमीने कमाल करत पाच विकेट मिळवून दिले. त्याच्या या प्रदर्शनामुळे इंग्लंड विरुद्ध सामन्यात कोणकोणते बॉलर टीम इंडिया खेळणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागल आहे.

World cup 2023 मध्ये लखनऊ येथील पीचचा रेकॉर्ड कसा आहे?

लखनऊच्या एकाना स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. लखनऊ येथील खेळपट्टी स्पिन गोलंदाजांना उपयोगी असल्याचा मानल जात. 2023 मध्ये झालेल्या आयपीएल 2023 मध्ये लखनऊची विकेट स्लो होती. मात्र वर्ल्ड कप 2023 साठी येथील पीच नवीन बनवण्यात आली आहे. आतापर्यंत येते वर्ल्ड कप चे तीन सामने झाले आहेत या तीन सामन्यांमध्ये फास्ट गोलंदाजांनी एकूण 27 विकेट घेतले आहेत. तर पंधरा विकेट्स स्पिन गोलंदाजांनी घेतले आहेत. म्हणजेच नवीन बनवण्यात आलेली पीच वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे Indian Cricket Team ने मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या दोघांनाही खेळवावं असं म्हणावं लागेल.

रोहित शर्मा (Rohit Sharma) पुढे यक्ष प्रश्न?

मोहम्मद सिराज(Mohammed Siraj) किंवा शमी(Mohammed Shami) या दोघांपैकी एकाला बाहेर बसवावे लागेल त्यामुळे रोहित शर्मा या दोघांपैकी कोणाचे बलिदान देईल, याकडे चाहत्यांचे लक्ष लागल आहे? मोहम्मद सिराज ना मागील 4 मॅच मध्ये अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन केलेले दिसत नाही. प्रत्येक सामन्यामध्ये पावर प्ले मध्ये त्याने बऱ्याच धावा दिल्या आणि विकेट तितक्या प्रमाणात घेतले नाहीत. मात्र न्यूझीलंडच्या सामन्यांमध्ये त्याला थोडी लय सापडली. मात्र मोहम्मद शमीने न्युझीलँड विरुद्ध सामन्यांमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत पाच विकेट्स घेतल्या त्यामुळे त्याला संधी देणे चुकीचे ठरणार नाही. न शमी विकेट स्लो असेल तर प्रभावी ठरतो. त्यामुळे आता रोहित समोर असलेला प्रश्न या दोघांपैकी कोणाला घ्यावं मोहम्मद शमीला की मोहम्मद सिराज क्रिकेटर. ला(mohammed siraj) आता रोहित शर्मा काय निर्णय घेतो हे पाहणं औत्सुक्याचा असेल.(Sport)