TET Exam Update: 2013 पूर्वीच्या शिक्षकांना टीईटी पूर्ण करण्याची अट लावण्यात आली होती मात्र आता NCTA च्या अधिसूचनेनुसार TET परीक्षा पास होण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील सूचना प्राथमिक शिक्षक संचनालयास दिलेल्या असून टीईटीचे अट काढल्यामुळे 2013 पूर्वी झालेल्या शिक्षकांना दिलासा मिळालेला आहे.
महाराष्ट्रातील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळेमध्ये नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा पास होणे शिक्षकांसाठी बंधनकारक आहे. मात्र पदोन्नती(Teachers promotion) प्रक्रिया होण्यासाठी राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद म्हणजेच एनसीटीई यांनी एक अधिसूचना काढून यावर बंधन घातले होते. त्यामुळे 2013 पूर्वी सेवेत रुजू झालेले आणि पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षक यांच्याकडे टीईटी परीक्षा (Maha TET exam) उत्तीर्ण झाल्याचे सर्टिफिकेट नव्हते. त्यामुळे विशेष शिक्षक म्हणून पदोन्नती (Shikshak Padonnati) कुणाला द्यावी असा प्रश्न सर्वांना होता.
वेगवेगळ्या संघटनांनी या संदर्भातील निवेदन दिले होते. 25 ऑक्टोबर 2023 रोजी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना पदोन्नती किंवा वेतनौन्नती देत असताना एन सी टी ई ने सांगितलेली व्यावसायिक अहर्ता आणि शैक्षणिक अहर्ता पूर्ण केलेली असल्यास मात्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी नसल्यास पदोन्नती देता येईल याची दक्षता आपल्या स्तरावरून घ्यावी अशी सूचना प्राथमिक शिक्षण संचालनायास (Prathmik Shikshan Sanchalanalay) दिलेले आहेत. (पदोन्नति (Padonnati) meaning in English)
या अधिसूचनेमुळे आता शिक्षकांच्या पदोन्नतिचा मार्ग मोकळा झाला आहे. बऱ्याच शिक्षकांना यामुळे विशेष शिक्षक म्हणून पदोन्नती मिळणार आहे. (TET 2023)