Nokia 105 Classic Price: नोकिया कंपनीने काही दिवसांपूर्वी नोकिया 105 4G 2023 मोबाइल लाँच केला. आता नोकिया ना आपल्या ग्राहकांसाठी नोकिया 105 क्लासिक हा मोबाईल आणला आहे. याची किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी आहे. नोकियाचा हा फीचर फोन असून यामध्ये यूपीआय पेमेंट सिस्टीम देखील देण्यात आलेल आहे. हा नवीन फोन फोरजी कनेक्टिव्हिटी सह देण्यात आलेल असून त्यामध्ये जबरदस्त बॅटरी बॅकअप मिळेल असं दावा नोकिया कंपनीने केलेला आहे.
Nokia 105 Classic Specifications
नोकिया 105 क्लासिकचे स्पेसीफिकेशन: नोकिया 105 क्लासिकचा सगळ्यात महत्त्वाचा फीचर म्हणजे यामध्ये इनबिल्ड यूपीआय एप्लीकेशन देण्यात आला आहे. भारतामध्ये सध्या यूपीआयची मागणी वाढत आहे सामान्य लोकांपासून भाजीपाला विक्रेत्यांपर्यंत यूपीआय वापरत आहेत. पैसे निवजी लोकं डिजिटल पेमेंट वापरत असल्यामुळे हे फीचर भारतीय ग्राहकांना आकर्षित करू शकतं.
नोकियाच्या ह्या फोनचा आणखी एक महत्त्वाचं फिचर म्हणजे विदाऊट हेडफोन आपण एफएम रेडिओ ऐकू शकतो. त्यामुळे मनोरंजनाचं एक महत्त्वाचा साधन देखील हा फोन बनू शकतो. फोन मध्ये ८०० एमएएची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन एकदम कॉम्पॅक्ट असल्यामुळे वापरण्यासाठी आणि खिशात ठेवण्यासाठी सोपा आहे. सध्या भारतीय बाजारात असलेला जिओभारत B1 या मोबाईलला नोकिया 105 क्लासिक या मोबाईल कडून स्पर्धा निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.
हे देखील वाचा: वर्ल्ड कप 2023 चे ताजे अपडेट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Nokia 105 Classic Price
नोकिया 105 क्लासिक ची किंमत: चार व्हेरिएंटमध्ये नोकिया 105 क्लासिक सादर करण्यात आला असून यामध्ये ड्युएल सिम आणि सिंगल सीम असे ऑप्शन देखील देण्यात आले आहेत. नोकियाचा हा फोन आपल्याला चार्जर शिवाय किंवा चार्जर सहित खरेदी करता येणार आहे. या फोनची किंमत केवळ 999 रुपये ठेवण्यात आलेले आहे. काळया व निळ्या रंगांमध्ये हा फोन देण्यात आलेला आहे. नोकिया कडून या फोनवर एका वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देखील देण्यात आलेली आहे.