wagh bakri tea director: पराग देसाई (parag desai wagh bakri) यांना मागील आठवड्यामध्ये अहमदाबाद येथे एका खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होत. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या घरा जवळच सकाळी चालायला गेले असताना त्यांच्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता आणि त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर त्यांच्यावर दवाखान्यामध्ये इलाज चालू होता.
वाघ बकरी टी ग्रुपचे संचालक
wagh bakri tea news: वाघ बकरी चहा (wagh Bakri tea) आपल्या प्रीमियम चहासाठी खूप प्रसिद्ध आहे याची स्थापना 1892 मध्ये करण्यात आली होती ही कंपनी चहा मध्ये ट्रेड करते. अलीकडच्या काळामध्ये प्रसिध्द असलेल्या चहा कंपनींपैकी एक वाघ बकरी चहा आहे. ही कंपनी सध्या दोन हजार कोटी(wagh bakri tea net worth) पेक्षा जास्त किमतीचे आहे. 50 लाखापेक्षा अधिक किलोग्रॅम चहा विकते.
ब्रेन हम्रेज मुळे झाला मृत्यू, brain hemorrhage म्हणजे काय?
मेंदूतील रक्तस्राव, ज्याला इंट्रासेरेब्रल हेमोरेज किंवा सेरेब्रल रक्तस्राव देखील म्हणतात, ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे जिथे मेंदूच्या ऊतींमध्ये रक्तस्त्राव होतो. हे उच्च रक्तदाब, डोक्याला आघात, एन्युरिझम किंवा रक्तवाहिन्यांच्या विकृतींसह विविध कारणांमुळे होऊ शकते. ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे आणि तत्काळ वैद्यकीय लक्ष देणे आवश्यक आहे.