वारा समानार्थी शब्द मराठी | Synonyms of wind in Marathi
वारा हा शब्द मराठी मध्ये प्रचलित आहे.  वारा आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही. मात्र आपण वाऱ्याला अनुभवू शकतो. म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसत नसले तरी त्याचा स्पर्श आपल्या शरीराला जाणवतं. वारा हा एक पंचमहाभूतातील तत्त्व असून तो आपल्याला केवळ स्पर्शाने जाणवू शकतो तो डोळ्याला दिसू शकत नाही.  

वारा समानार्थी शब्द मराठी

वारा या मराठी शब्दाला बरेच समानार्थी शब्द आहेत त्यापैकी अनिल हा एक शब्द समानार्थी शब्द म्हणून वाऱ्याला वापरला जातो. पवन हा देखील शब्द वारा या शब्दाला समानार्थी शब्द आहे. मारुत किंवा मरुत हे दोन्ही शब्द वारा या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. 

आपण नेहमी वापरत असलेला शब्द तो म्हणजे हवा हा शब्द देखील वारा या शब्दाला समानार्थी आहे. वायु आणि वात हे दोन्ही शब्द वारा या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. याशिवाय समीर आणि समीरण हे दोन्ही शब्द देखील वारा या शब्दाला समानार्थी शब्द आहेत.