Whatsapp Tips: व्हॉट्सॲप आपल्या जिवा भावाच ॲप. काय काय लोक तर दिवस दिवस पडीक असत्यात. मात्र आपल्या नवीन नंबरवर मेसेज करायचं म्हणल तर नंबर सेव करा. मग व्हॉट्सॲप मध्ये जाऊन बघा असल किडं करावं लागतंय. मात्र आलिकड व्हॉट्सॲप देखील लई हुशार झालंय आणि युजर्सला काय पाहिजे याकड लक्ष देत आहे.
त्यात नंबर सेव्ह करायच्या कटकटीतन आपली सुटका झाल्या ती कशी आज जाणून घेऊया. आणि या सोप्या ट्रिक न आपल्याला नंबर सेव्ह न करता कुणालाही मेसेज पाठवता येणार हाय.
WhatsApp चॅटमध्ये पाठवा नंबर
• WhatsApp अॅप चालू करायचं आणि Message to yourself सर्च करायचं. हे सगळ्यात सोप आहे यासाठी तुम्हासनी सर्च बॉक्समध्ये You टाइप करायला लागतंय.
* नंतरन चॅट बॉक्सवर जायचं आणि ज्याला तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे ते नंबर तिथं पेस्ट करायचं.
• आता तो पेस्ट केलेला नंबर सेंड केल्यावर निळ्या रंगात दिसतंय. त्यावर क्लिक केलं तर त्या नंबरला मेसेज करण्याचा पर्याय येतय.
अश्या सोप्या रीतीन तुम्ही कुणाचाही नंबर सेव्ह न करता कुणालाही चॅटिंग करू शकता.
ग्रुपमधील मेंबर्सना करा मेसेज
• जर तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये असलेल्या युजरला त्याचा नंबर सेव्ह न करता मेसेज पाठवता येण्यासाठी ही पद्धत वापरता येतय.
• सगळ्यात पहिला व्हॉट्सअॅपमधील संबंधित ग्रुप मध्ये जावा.
• जर त्या माणसानं ग्रुप चॅटमध्ये एखादा मेसेज टाकला असेल तर त्या माणसाच्या नावावर किंवा मोबाइल नंबरवर क्लिक करायचं.
• नंतर समोर ऑप्शन येतील त्यातल मेसेज आयकॉन सिलेक्ट करायचं.
• नायतर तुम्ही दुसऱ्या पद्धतीनं ग्रुप इंफोर्मेशन पेजवर जाऊन देखील युजरला सर्च करून तिथून मेसेज पाठवू शकता.
चॅट लिंक बनवून पाठवा व्हॉट्सअॅप मेसेज
• सगळ्यात पहिला पुढची लिंक क्लिपबोर्डवर कॉपी करायचं – https://wa.me/phone-number.
• आता दिलेल्या लिंकमध्ये ज्या नंबरला व्हॉट्सअॅप मेसेज पाठवायच हाय त्ये मोबाइल नंबर पण कॉपी करायचं.
• आता Google Chrome/ फायरफॉक्स / एज सारखं कोणत पण वेब ब्राउजर ओपन करायचं.
• दिलेलं लिंक URL बार च्या तिथं पेस्ट करायचं आणि तिथं ‘फोन-नंबर’ च्या जागी कंट्री कोडसह त्यांचं मोबाइल नंबर टाकायचं.
• आता ही बनवलेली नवीन link उघडली तर तुम्ही व्हॉट्सअॅपच्या ॲपवर जाल. नंतरन फक्त चॅटच्या बटनवर टॅप करायचं.
• एवढं केला तर व्हॉट्सअॅप चॅट विंडो चालू होईल आणि नंबर सेव्ह न करता मेसेज पाठवू शकताल.