न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पहिल्या पत्नीचे सखू उर्फ रमा यांचे निधन झाले. त्यामुळे न्यायमूर्ती रानडे यांचे वडील गोविंदराव रानडे यांनी न्या. महादेव रानडे यांना दुसऱ्या लग्नाचा आग्रह केला. त्यामुळे 1873 रोजी अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या धाकट्या मुली सोबत म्हणजेच यमुना हिच्या सोबत न्यायमूर्ती रानडे यांच लग्न झालं.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना आपल्या पत्नीला सामाजिक कार्य करण्यासाठी तयार करायचे असल्याने त्यांनी पत्नीला शिकवायला सुरुवात केली. 1876 पासूनच रमाबाई रानडे यांनी इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली.