ICC World Cup 2023: वर्ल्ड कप 2023: आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सध्या भारतामध्ये चुरशीची होत चाललेली आहे. इथून पुढे होणारे सामने हे सेमी फायनल च्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहेत. विश्वचषक स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 24 सामने जिंकलेले आहेत आता येत्या सहा दिवसांमध्ये म्हणजेच 31 ऑक्टोबर पर्यंत सेमी फायनल मध्ये कोणकोणते टीम्स जातील याचे चित्र जवळपास स्पष्ट होणार आहे. 
31 ऑक्टोंबर रोजी आईसीसी वर्ल्ड कप 2023 तील 31 वा सामना खेळवण्यात येणार आहे. तर 29 ऑक्टोंबर रोजी इंग्लंड आणि भारत यांच्या दरम्यान एक महत्त्वाचा सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाने जर विजय मिळवला तर भारताचं सेमी फायनल मधलं स्थान पक्क होणार आहे.

Cricket World Cup 2023 मधील पुढील 6 दिवस महत्त्वाचे?

येणाऱ्या सहा दिवसांमध्ये विश्वचषकामधून(world cup 2023 match) पाच संघ स्पर्धेतून बाहेर जाणार आहेत. म्हणजेच या संघांच्या सेम फायनल मध्ये खेळण्याच्या आशा संपणार आहेत. याचा सर्वात मोठा धक्का पाकिस्तान संघाला बसण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेसोबत 27 ऑक्टोबर रोजी सामना खेळायचा आहे. मात्र सध्या दक्षिण आफ्रिका संघचा जबरदस्त फॉर्म दिसत आहे. त्यामुळे पाकिस्तान 27 ऑक्टोबर रोजी होणारा सामना जिंकेल अशी आशा खूपच कमी आहे. बाबर अजून कॅप्टन असलेल्या पाकिस्तान संघाची घर वापसी 27 ऑक्टोबर रोजी ठरणार आहे. दक्षिण आफ्रिके नंतर पुढील सामना बांगलादेश या संघासोबत पाकिस्तानचा होणार आहे. तर मागील काही सामन्यांमध्ये बांगलादेश संघ उलटफेअर करण्यात माहीर दिसत आहे. त्यामुळे पाकिस्तान सोबत होणाऱ्या सामन्यांमध्ये बांगलादेश उलट फेर करू शकेल का? याची चिंता पाकिस्तान संघाला लागली आहे.  

तर दुसरीकडे क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये बांगलादेश नेदरलँड श्रीलंका अफगाणिस्तान हे संघ देखील सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर जाणार हे जवळपास आता निश्चित होत आला आहे. बांगलादेश आणि नेदरलँड यांच्या क्रिकेट संघांना आतापर्यंत झालेल्या पाच मॅच पैकी केवळ एका मॅच मध्ये विजय मिळवता आला आहे. तर अफगाणिस्तानच्या संघाला पाच पैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर अफगाणिस्तान संघाचे पुढील तीन सामने श्रीलंका ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांशी होणार आहेत. श्रीलंका क्रिकेट टीमला देखील चार पैकी केवळ एका सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर गत विजेता इंग्लंडला चार पैकी एका सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. (वर्ल्ड कप मैच शेड्यूल)
header ads

क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या संघामध्ये 28 ऑक्टोबर रोजी मॅच होणार आहे. हा सामना झाल्यानंतर पॉइंट टेबल चे चित्र स्पष्ट होणार आहे.