या विश्वचषकात (ind vs afg odi scorecard) भारताचा प्रवास ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून सुरू झाला आणि आजच्या सामन्यात अफगाणिस्तानला हरवत त्यांचे वर्चस्व कायम राहिले. सध्या, भारताचा रन रेट +१.५ आहे, तर पाकिस्तानचा ०.९ आहे. दक्षिण आफ्रिकेचा रन रेट +2 पेक्षा जास्त असूनही, केवळ एकच सामना खेळल्यामुळे चौथ्या क्रमांकावर आहे.
इंग्लंड संघाने दोन सामन्यांतून एक विजय आणि एक पराभवासह पाचव्या क्रमांकावर, तर बांगलादेशने एक विजय आणि एक पराभव नोंदवून सहाव्या स्थानावर आहे.
पाच वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया आणि एकदाच चषक पटकावणाऱ्या श्रीलंकेला या स्पर्धेत अद्याप विजयाची चव चाखता आलेली नाही. ऑस्ट्रेलिया सातव्या स्थानावर आहे, तर श्रीलंका आठव्या स्थानावर आहे, त्यांना त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत, त्यांनाही त्यांच्या सर्व सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीत झालेल्या आजच्या सामन्यात रोहित शर्माच्या भारतीय संघाला विजयासाठी २७३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. तथापि, रोहित शर्माचे शानदार शतक आणि इशान किशन (Ishaan Kishan) सह त्याची १५६ धावांची भागीदारी भारताच्या विजयात मोलाची ठरली आणि आठ विकेट्स आणि ९० चेंडू शिल्लक असताना भारताने विजय मिळवला. विराट कोहलीने( Virat Kohli) आपला असाधारण फॉर्म कायम ठेवत 56 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. अफगाणिस्तानने त्यांच्या 50 षटकांत 8 बाद 272 धावा केल्या होत्या, हशमतुल्ला शाहिदी (hashmatullah shahidi) आणि अझमतुल्ला ओमरझाई(Azmatullah Omarzai) यांनी चौथ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली होती. भारताच्या जसप्रीत बुमराहने(Jasprit Bumrah) गोलंदाजीत चमक दाखवत चार बळी घेतले, तर हार्दिक पांड्याने(Hardik Pandya) या रोमांचक सामन्यात दोन बळी घेतले.
पुढील सामना भारत विरुद्ध पाकिस्तान 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे.