Characteristics of Viruses: विषाणूंना सामान्यपणे सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव किंवा निर्जीव यांच्या सीमारेषेमध्ये आहेत असं म्हटलं जातं. मात्र विषाणूंचा अभ्यास सूक्ष्मजीव शास्त्रामध्ये म्हणजेच मायक्रोबायोलॉजी मध्ये केला. 
विषाणूंची वैशिष्ट्ये: Characteristics of Viruses in Marathi 

• विषाणू हे खूपच अतिशय असून हे जिवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असतात त्यामुळे यांना पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी याचा उपयोग केला जातो. 
• विषाणू हे स्वतंत्र कणाच्या स्वरूपामध्ये आढळतात.
• विषाणू म्हणजे डीएनए किंवा आरएनए पासून बनलेला एक लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते.
• विषाणू हे वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशी मध्ये राहू शकतात. विषाणू स्वतःची प्रथिने बनवण्यासाठी पेशींची मदत घेतात. 
• विषाणूंना सजीव मानले जात नाही कारण त्यांच्यात जीवाणू, बुरशी, वनस्पती आणि प्राण्यांमध्ये आढळणारी सेल्युलर रचना नसते.
• याद्वारे स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात आणि यजमान पेशींना नष्ट करून प्रतिकृती मुक्त होतात असे मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात.
• वनस्पती आणि प्राण्यांना विषाणूमुळेच विविध रोग होतात.