कोलकत्ता येथील ईडन गार्डन्स मैदानावर वर्ल्ड कप 2023 चा 44 वा सामना रंगला आहे. हा सामना इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये खेळवला जात आहे. हा या दोन्ही संघांचा शेवटचा साखळी सामना आहे. सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडला नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
आणि 50 ओव्हर मध्ये 9 बळी देत 338 धावांचे लक्ष्य पाकिस्तानला दिल आहे. या सामन्याच्या आधी पाकिस्तानने सेमीफायनल मध्ये जाण्याची आशा राखून ठेवली होती. मात्र इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यावर त्यांच्या या अशा संपुष्टात आल्या होत्या.
-
सेमीफायनल मध्ये जायचं असेल तर पाकिस्तानला पहिल्यांदा फलंदाजी करत किमान 287 धावांनी हा सामना जिंकायला हवा होता. तर दुसऱ्या ईनिंग मध्ये केवळ 2.5 ओवर मध्ये 300 धावा करायचे लक्ष्य होते. मात्र पाकिस्तान कडून या दोन्हीपैकी एक पण लक्ष्य गाठता येणार नाही. त्यामुळे त्यांचा या वर्ल्ड कप 2023 मधला प्रवास संपला आहे. त्यांना आता शेवटच्या सामन्यामध्ये इंग्लंडचा पराभव करत विजयासह वर्ल्ड कप 2023 चा प्रवास शेवट करायचा आहे. त्यासाठी ही पाकिस्तानला इंग्लंडने दिलेलं 338 धावांचं लक्ष्य पूर्ण करावं लागणार आहे.
इंग्लंड कडून खेळत असताना या सामन्यात डेव्हिड मलान 31, जॉनी बेअरस्टो 59, जो रूट 60, बेन स्टोक्स 84, जोस बटलर 27 आणि हॅरी ब्रूकने 30 इतक्या धावा घेत इंग्लंडची धावसंख्या चांगल्या पद्धतीने वाढवली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: