आता कांतारा चित्रपटाच्या यशानंतर या चित्रपटाच्या प्रीक्वलची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. कांतारा अ लीजेंड चॅप्टर-१ असे या प्रीक्वल चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातील अभिनेता ऋषभ शेट्टीचा फर्स्ट लुक सोबतच थरारक टीझर आज रिलीज करण्यात आला आहे.
ऋषभ शेट्टीने कांतारा 'अ लीजेंड चॅप्टर-१' या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला. यात ऋषभ तो रक्ताच्या थारोळ्यात भिजलेला दिसत आहे. तर एका हातामध्ये त्रिशूळ दिसतोय. यावेळी कांतारा 'अ लीजेंड चॅप्टर-१' या चित्रपटाच्या फर्स्ट लूकचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे. Kantara Chapter 1 चा टीझर रिलीज झाल्यानंतर चाहते लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.
कांतारा’ अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून केवळ 16 कोटी रुपयांमध्ये आहे. चित्रपट केवळ साऊथच नाही तर, हिंदीत सुद्धा हिट झाला. अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेमध्ये होते. ऋषभ चित्रपटात शिवाची भूमिका साकारला आहे. हा चित्रपट मुळ कन्नड भाषेत तयार करण्यात आला आहे. तेलगू सोबत हिंदी भाषेत सिनेमा डब करण्यात आला होता. नेटफिलिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हा चित्रपट पाहायला मिळेल.