SSC board time table 2024: फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये होत असलेल्या दहावी आणि बारावी परीक्षांचे फायनल वेळापत्रक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून जाहीर करण्यात आलं आहे. दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे तर दहावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. सदर परीक्षांचे वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच उपलब्ध केले जाणार आहे.
10th Board exam Timetable 2024

10वीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ही 10 फेब्रुवारी पासून 29 फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. तर बारावीची हीच परीक्षा 2 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणार आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा ही 1 मार्चपासून 26 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीला चालू होऊन 19 मार्च या कालावधीत होणार आहे.

HSC board time table 2024: आता मंडळाच्या वेबसाईटवर दिलेली वेळापत्रकाची सुविधा ही केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. बोर्ड परीक्षांच्या पूर्वी माध्यमिक शाळात उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये हे छापील वेळापत्रक मिळणार असून त्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे अशा पद्धतीच्या सूचना राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओळख यांनी दिलेले आहेत.(ssc exam news)

मंडळाच्या वेबसाईट शिवाय किंवा अनियंत्रणेने छापलेले किंवा whatsapp किंवा सोशल मीडिया मधून प्रसिद्ध झालेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये असे आवाहन यावेळी मंडळामार्फत करण्यात आले आहे.

10th & 12th Timetable 2023-24

12 वी :- सर्वसाधारण, व्यवसाय व द्विलक्षी अभ्यासक्रम: 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024

12 वी:- माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा: - 20 ते 23 मार्च 2024
 
10वी:- बोर्ड परीक्षा 1 ते 26 मार्च 2024