12th Pass Man Poses As Doctor: अल्ताफ हुसेन खान नावाच्या ५० वर्षीय व्यक्तीला गोवंडीतील शिवाजी नगर परिसरातून अटक करण्यात आले असून त्याने सात वर्षांपासून डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णावर उपचार करत फसवणूक केली आहे. बैंगणवाडी येथील रहिवासी असलेल्या अल्ताफ हुसेन खानचे शिक्षण केवळ 12 वी झाले आहे. 

12th Pass Man Poses As Doctor

गुप्त अधिकार्‍यांनी खानच्या क्लिनिकवर छापा टाकत असताना रूग्ण असल्याचे भासवले आणि त्यांनी खान रूग्णांवर उपचार करत असताना आणि औषधे लिहून देताना पाहिले. या गुप्त मोहिमेदरम्यान खान याने विशिष्ट मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी करण्याची शिफारस केली.

रुग्णाच्या रूपात MBBS डॉक्टरांसह गुप्त अधिकार्‍यांनी, आजारी असल्याचे भासवत औषधे लिहून देण्याची विनंती केली आणि कायदेशीर वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना सुद्धा औषधे लिहून देताना रंगेहात पकडले. खान याला ताबडतोब अटक करण्यात आली असून क्लिनिकची झडती घेतल्यावर वेगवेगळी वैद्यकीय साहित्य, स्टेथोस्कोप, गोळ्या, सिरप, आणि सिरिंज असे साहित्य जप्त करण्यात आले.

freepressjournal ने दिलेल्या वृत्तानुसार शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये खानविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत 420 (फसवणूक) आणि 419 (व्यक्तीद्वारे फसवणूक) सह एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या बरोबर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी कायद्याच्या कलम 33 (अनोंदणीकृत व्यक्तीद्वारे वैद्यकीय सराव करण्यास मनाई) आणि 36 (डॉ, एमबीबीएस, बीएएमएस सारख्या पदव्यांचा अनधिकृत वापरास प्रतिबंध) अंतर्गत आरोप आहेत.