Lasalgaon Krishi Utpann Bajar Samiti: लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडामधली नंबर एकची बाजार समिती म्हणून ओळखली जाते. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांद्याच्या लिलावासाठी प्रसिद्ध आहे. कांद्यासोबतच येथे धान्य भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादने उत्पन्न लिलाव होतात. मात्र आज पासून ही कृषी उत्पन्न बाजार समिती 12 दिवस बंद राहणार आहे.
आज पासून बारा दिवस लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील मुख्य कांदा बाजार बंद राहणार आहे.
दीपावलीमुळे (Diwali 2023) कांदा विभागामधील व्यापारी लिलावामध्ये सहभागी शकणार नाहीत. दिवाळी असल्यामुळे कांदा आणि धान्य शेतीमालाचे सर्व लिलाव बंद ठेवण्यात येणार आहेत. हे लिलाव आजपासून 12 दिवस म्हणजे 18 नोव्हेंबर पर्यंत बंद असणार आहेत.
दिवाळीमध्ये कांद्याचे लिलाव आणि इतर धान्य मालाचे लिलाव बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. यानंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती 18 नोव्हेंबर पासून पुन्हा सुरू होणार आहे.