Xiaomi या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन Redmi 13C लाँच केला आहे. 50 मेगापिक्सल चा कॅमेरा 8 जीबी रॅम आणि मीडियाटेक हेलिओ चिपसेट असलेला हा स्मार्टफोन सध्या नायजेरियन बाजारामध्ये आलेला आहे. हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांच्या भेटीस लवकरच येऊ शकतो.(redmi 13c launch date in india) रेडमी 13C या स्मार्टफोनचे फीचर्स स्पेसिफिकेशन्स आणि किंमत याबद्दलची माहिती पुढे तुम्हाला देण्यात येणार आहे.
Redmi 13C चे स्पेसिफिकेशन्स
Redmi 13C हा स्मार्टफोन 720 x 1600 पिक्सेल्स रेग्युलेशन असून 6.74 इंच एचडी प्लस डिस्प्ले या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. आयपीएस एलसीडी पॅनलवर हा स्क्रीन बनलेला असून याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्झ आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टीम मिळत असून एम आय यु आय 14 वर हा स्मार्टफोन ग्राहकांसमोर ठेवण्यात आला आहे. मीडियाटेक हिलीओ जी 99 हा चिप्स या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंग साठी देण्यात आला आहे. यामध्ये दोन व्हेरेंट असून एक चार जीबी आहे आणि दुसरा आहे तो आठ जीबी रॅम असलेला आहे. यामध्ये होम स्टोरेज 256 जीबी देण्यात आली आहे. या फोनमध्ये 4 जीबी व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजी देण्यात आले असून यामुळे या स्मार्टफोनचे रॅम ची पावर 12 जीबी पर्यंत होते.
-
Redmi 13C ची किंमत
Redmi 13C हा स्मार्टफोन नायजेरिया मध्ये दोन व्हेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.
Redmi 13C 4GB - NGN 98,100
Redmi 13C 8GB - NGN 108,100
4GB रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत(redmi 13c price) भारतीय रुपयांमध्ये बघायला गेल्यास ₹ 10,100 इतकी होईल. तर 8 जीबी मॉडेल असलेल्या स्मार्टफोनची किंमत ₹ 11,100 इतकी होईल.(redmi 13c price in india) तर सदर स्मार्टफोन ब्लॅक आणि फ्लोअर ग्रीन अशा दोन कलर रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Redmi 13C is a smartphone launched by Xiaomi in November 2023. It has a 6.74-inch HD+ display with a 90Hz refresh rate, a MediaTek Helio G85 processor, a 50MP triple camera setup, and a 5000mAh battery with 18W fast charging.