अनेक विविध बातम्यांमध्ये आपण दारू पिल्यामुळे मृत्यू झाल्याच्याबातम्या ऐकत असतो. दारूमुळे अनेकांचे प्राण गेलेले आहेत, जात आहे. तरीसुद्धा विषारी दारूवर बंदी आली नाही. या दारूमुळे बऱ्याच जणांचे प्राण दरवर्षी जात आहे.
अशीच विषारी दारू पिल्यामुळे हरियाणामध्ये 14 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकाच दिवसांत दारू प्यायला मुळे एवढ्या लोकांचा मृत्यू झाल्याचे ऐकून खळबळ उडाली आहे. तेथील पोलिसांनी या घटनेनंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
आत्तापर्यंत यमुनानगर पोलिसांनी या प्रकरणात सात जणांना अटक केली आहे. या प्रकरणात असलेल्या दारूचा तपास केला जात आहे आणि अटक केलेल्या लोकांची चौकशी सुद्धा सुरू आहे.
हरियाणा राज्यातील अंबाला आणि यमुना नगर परिसरामध्ये गेल्या काही दिवसात विषारी दारू पिल्यामुळे 14 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यमुनानगर येथील 12 जण असून अंबाला जिल्ह्यातील दोघांचा यात समावेश आहे. यमुना नगर येथील मंडेवरी गावामध्ये एका दिवसात सहा व्यक्तींचा मृत्यू विषारी दारूमुळे झाला आहे. सगळीकडे दिवाळी सणामुळे उल्हासदायक वातावरण असताना अशी घटना घडल्याने संपूर्ण गावावर दुःख पसरले आहे. या गावातील काही लोक दारू तयार करून विकतात. दारू प्यायला नंतर हे मृत्यू झाल्याचे गावांमधील लोकांनी सांगितले आहे.
गावातच बनवण्यात आलेल्या दारूमुळे अनेक लोकांना रक्ताच्या उलट्या झाल्या असून काही जणांना डोळ्यांना दिसायचे देखील बंद झाले आहे. गावातील लोकांनी त्यांची भरती रुग्णालयात केली असून रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचे प्राण गेले आहेत. या मृत्यूला विषारी दारू जबाबदार असल्याचे डॉक्टरांनी सांगितल. लोकांनी या प्रकरणात तक्रार करत संपूर्ण माहिती पोलिसांना दिली आहे.
-
ही गावातील दारू प्यायल्यानंतर अनेक लोकांना रक्ताच्या उलट्या झाल्या तर काहींना डोळ्यांना दिसायचे बंद झाले. त्यानंतर गावातील लोकांनी त्यांना रुग्णलयात भरती केले. परंतू रुग्णालयात पोहचण्याआधीच त्यांचे प्राण गेले. डॉक्टरांनी मृत्यूस विषारी दारू जबाबदार असल्याचे म्हटले आहे. गावातील लोकांनी या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार करीत संपूर्ण माहीती दिली आहे. यमुना नगर पोलिसांना या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
अंबाला पोलीस स्टेशनची एसपी जशनदीप सिंह रंधावा यांनी सांगितले बींजलपूर या गावांमध्ये असलेल्या दारूच्या फॅक्टरीत दारू तयार केली जात असून इथूनच आजूबाजूच्या गावामध्ये लोकांना विकली गेली आहे. यमुना नगर पोलिसांनी आत्तापर्यंत सात लोकांना अटक केली आहे. पोलिसांनी बेकायदेशीर दारू विकल्या प्रकरणी नरेश कुमार, राजेश कुमार, राजकुमार आणि राधेश्याम यांच्यावर केस दाखल केली आहे.