प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर छोट्या पडद्यावरील काही मालिका करतात. त्यामध्ये 'जुळून येती रेशीमगाठी' (Julun Yeti Reshimgathi) ही एक मालिका आहे. प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर या दोघांची जोडी या मालिकेत(Marathi Serial) झळकली होती. प्रेक्षकांनी अक्षरशः या दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतले होते.
या मालिकेत ललित प्रभाकर(Lalit Prabhakar) ने आदितीची भूमिका साकारली होती आणि प्राजक्ता माळीने मेघनाची भूमिका निभावली होती. सध्या सगळीकडे या मालिकेचा सीक्वल येणार असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर ललित ने ही चर्चा शेअर केलेल्या पोस्टर नंतर सुरू झाली आहे.
प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोबत चे फोटो ललित प्रभाकरने इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. काढायचं का दुसरा भाग? असं त्याने फोटो शेअर करत लिहिले आहे. जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेचं नाव तरी ऐकलं असेलच तुम्ही. १० वर्ष पूर्ण झाले जुळून येतील रेशीमगाठी या मालिकेला. चाहात्यांनी प्राजक्ता आणि ललितला एकत्र पाहून भरपूर प्रेम व्यक्त केला आहे.
तुम्ही दोघे एकत्र खूप सुंदर दिसत आहात असे अभिनेता सारंग साठे याने या पोस्टवर कमेंट केली आहे.तुमची मालिका सुरू झाली तर चॅनेलचा टीआरपी वाढेल असे एका युजरने म्हटले.चाहत्यांना वाटत की जुळून येती रेशीमगाठीचा सीक्वल (Julun Yeti Reshimgathi Sequal) यावा. शर्मिष्ठा राऊत, उदय टिकेकर, सुकन्या कुलकर्णी, सायली देवधर, मधुगंधा कुलकर्णी त्यांनी देखील या मालिकेत प्राजक्ता ललित त्यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेत होते. (मराठी बातम्या ताज्या)