20 lakh rupees note necklace: दिवाळी झाली आणि आता तुळशी विवाह होतो आणि सर्वत्र लग्नाची धामधूम सुरू होते. सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होतात. नवरीचे नवऱ्याचे एकापेक्षा एक असे व्हिडिओ व्हायरल होतात.
असंच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये नवरदेव नेटकर यांचे लक्ष वेधून घेत आहे. नवरदेवाचे झालेली अवस्था पाहिल्यास तुम्ही देखील डोक्याला हात लावून घ्या. भारतात सर्व जाती-धर्माचे लोक राहतात त्यामुळे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यासोबत प्रत्येक जाती धर्माच्या परंपरा प्रथा वेगवेगळ्या आहेत.
भारतामध्ये लग्नात नवरदेवाच्या गळ्यात पैशांनी बनवलेला हार घालायची काही ठिकाणी पद्धत आहे. काही ठिकाणी हा हार खरा पैशांचा असतो तर काही ठिकाणी प्रतिकात्मक म्हणून खोट्या पैशांचा वापर केला असतो. मात्र व्हायरल व्हिडिओमध्ये तब्बल वीस लाखाचा हार नवरदेवाने आपल्या गळ्यात घातला आहे. तर हा हार बनवण्यासाठी 500 रुपयांचा नोटा वापरण्यात आले आहेत. वीस लाख रुपयांच्या नोटांची या हराची लांबी इतकी लांब होती की नवरदेवाला दुसऱ्या माडीवर चढावं लागलं. पाचशे रुपयांच्या नोटांचा वापर करत फुलांसारखा या हाराला आकार देण्यात आला होता तर हा हार लांब असल्यामुळे नवरदेवाला घालताना नाकी नऊ त्यामुळे त्याने दुसऱ्या मजल्यावर जात हार आपल्या गळ्यात घातला.
इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @dilshadkhan_kureshipur युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. सदर व्हिडिओ हरियाणा मधील असल्याचं बोललं जात आहे. एक कोटीहून अधिक व्ह्यूज आतापर्यंत या व्हिडिओला मिळाले आहेत. तर व्हिडिओवर कमेंट चा अक्षरश पाऊस पडत आहे. कमेंट वाचून देखील तुम्ही पोट धरून हसायला लागल एका युजरने तर लिहिल आहे. नवरदेवाने ड्रीम इलेव्हन जिंकली आहे वाटतं. दुसऱ्या एका युजरने लिहिला आहे आता आयकर विभाग याच्या घरावर छापा टाकणार आहे. हाराची लांबी खूपच जास्त असून नवरदेव घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन थांबला असला तरी तो हार अंगणापर्यंत लांब गेला आहे.
इंटरनेटवर व्हायरल झालेला व्हिडिओ: