Mumbai Crime News: मुंबईत 22 वर्षांपूर्वी घडलेल्या हत्याकांडाने सगळ्यांनाच हादरवून सोडले. जोडप्याला जिवंत एका चहाच्या दुकानात जाळण्यात आले. आता अखेर 22 वर्षांनी या प्रकरणात न्याय झाला आहे. 48 वर्षांचे जहराबी आणि तिचे पती अब्दुल रहमान 2001मध्ये कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये झालेल्या अग्नीकांडात यांचा जळून मृत्यू झाला होता. 
दहिसर क्राइम ब्रँचला या घटनेतील फरार आरोपी असलेल्या यशवंत बाबूराव शिंदे याला पकड्त यश आले आहे. मोहिद्दीन शेख, नागनाथ तेलंगे आणि व्यंकट पाचवाड यांना यापूर्वी पोलिसांनी आरोपी शिंदेंचे सहकारी यांना अटक केली होती. यशवंत शिंदें या मुख्य आरोपीला मात्र शोधू शकले नव्हते. पोलिसांना मात्र आता यश आलं आहे. 
पोलीस निरीक्षक सुधीर दळवी आणि विजय रासकर, दिलीप तेजनकर व नवनाथ जगताप हे डीसीपी राजतिलक रौशन यांच्या आदेशानुसार यांच्या पथकाने ही केस पुन्हा रिओपन केले. आरोपीच्या लातूर गावात गेल्या काही दिवसांपासून शोधमोहिम आखली होती. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोंढवामध्ये आरोपी असल्याची माहिती तिथेच त्यांना मिळाली.शुक्रवारी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. 
  
 एकतर्फी प्रेम 

पेटिंगचे काम यशवंत करायचा. मुंबईत साथीदारांसह आला. कारण मुंबईत काम मिळेल आणि पैसेही जास्त मिळतील यासाठी आला होता. तिथे त्याला अब्दुलच्या आणि जहराबी मुलीवर प्रेम जमले तिच्यासोबत त्याला लग्न करायचे होते. पण लग्नासाठी तिच्या आई-वडिलांनी नकार दिला. यशवंतला त्यांनी एक दोन वेळा मारहाणदेखील केली. या प्रकरणी तक्रार पोलिसांनी दाखल केली. त्यांच्या मुलीचं लग्न त्यांनी दुसरीकडे ठरवले. मुलीच्या आई-वडिलांना धडा शिकवण्याचा यशवंतने रागाच्या भरात निर्णय घेतला. 
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗


भावांसोबत मुलगी घरात झोपलेली असताना त्यांच्या चहाच्या दुकानात तिचे आईवडिल गेले होते. तिथेच झोपत ते दोघेही अशत. 2001 मध्ये आरोपीने हॉटेलला 12 ऑगस्ट रोजी आग लावली. जहराबी आणि अब्दुल या दोघांचा झोपलेले असताना मृ्त्यू झाला. या केसमधील तीन आरोपींना त्यावेळी पोलिसांनी अटक केली. यशवंत शिंदेचे नाव त्यांच्या चौकशीतून समोर आले. त्यानंतर त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली. पण काहीच तपास त्याचा लागला नाही. 

आरोपी बेंगळुरुला मुलीच्या आई-वडिलांची हत्या केल्यानंतर पळून गेला. त्यानंतर पुण्यात तो राहू लागला. इतकंच नव्हे तर त्यांने 2005 मध्ये लग्नही केले. त्याच्या आई-वडिलांनाही त्याची खबर लागू दिली नाही. 22 वर्षांनंतर त्याला इतक्या प्रयत्नानंतरही अटक करण्यात यश आलं आहे.