दररोज बातम्यांमध्ये वेगवेगळ्या चकित करणाऱ्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो पाहत असतो. अशीच बातमी आज हाती आली असून उत्तरप्रदेश मध्ये एक लग्न होत असून त्या लग्नातील वर हा 29 वर्षाचा आहे तर वधू 67 वर्षाची आहे. या लग्नाची गोष्ट आहे देखील जबरदस्त. हे लग्न प्रथम लग्न नसून पुनर्विवाह असल्याची माहिती मिळत आहे.
या लग्नात जोडप्याचा मुलगा, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे देखील सामील होणार आहेत. जर वर पुनर्विवाह 29 व्या वर्षी करत आहे तर त्याचे प्रथम लग्न कधी झाले असेल असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे?
उत्तर प्रदेशातील आझमगढमध्ये हा पुनर्विवाह होत असून यातील नवरदेव हा अनेक वर्षे कागदावर मृत होता. नवरदेवाच नाव लालबिहारी असून तो अनेक वर्षे कागदावर मृत होता. आता कागदोपत्री ते जिवंत असून सरकारी कागदपत्रात ते 30 जुलै 1976 ते 30 जून 1994 या कालावधीमध्ये त्यांना मृत दाखवण्यात आलं होत. त्यामुळे प्रशासनासोबत प्रदीर्घ लढा देत कागदपत्रांमध्ये ते पुन्हा जिवंत झाले.
कागदोपत्री जिवंत दाखवण्यात आल्यानंतर मृत्यूची फाईल गायब करण्यात आली. त्यामुळे लाल बिहारी यांना जिवंत असल्याचे दाखवण्यासाठी 47 वर्ष झुंज द्यावी लागली. आता त्यांचं खर वय 69 वर्ष असलं तरी ते कागदपत्रांमध्ये जिवंत झाल्यापासूनची तारीख धरतात. त्यामुळे कागदपत्रांनुसार त्यांचं वय 29 वर्षे असल्याचे त्यांनी जाहीर केले असून ते पुन्हा आपल्या पत्नी सोबत लग्न करत आहेत. त्यामुळे वराचे वय 29 वर्ष तर वधूचे वय 67 वर्ष झाले आहे.
0 टिप्पण्या