एका भीषण बस अपघाताची घटना आताच समोर येत असून ही घटना काश्मीर मधील दोडा जिल्ह्यात घडली आहे. येथील आसार भागामध्ये त्रांगल येथे प्रवासी बस 250 मीटर खोल दरीमध्ये कोसळली.
किश्तवाडहून जम्मूकडे ही बस निघाली होती. मिळालेल्या माहितीनुसार 36 प्रवाशांचा मृत्यू या बस अपघातात झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस, बचाव पथक घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू झाले आहे.
समोर येत असलेल्या माहितीनुसार, ही भीषण अपघाताची घटना जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात (Doda Bus Accident) समोर आली आहे. किश्तवाडहून ही बस जम्मूला जात असताना दोडा जिल्ह्यात आसार भागात त्रंगलजवळ दरीत 250 मीटर खोल कोसळली. 36 जणांचा मृत्यू या अपघातात झाली असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांना आणि बचाव पथकांना या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले आहेत. बचावकार्य सुरू असून 19 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहेत. जिल्हा रुग्णालय किश्तवाड, सर्वसाधारण रुग्णालय दोडा येथे जखमींना नेण्यात आले आहे.