आजच्या बातम्या ताज्या: जम्मू काश्मीर येथील राजौरी जिल्ह्यामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यामध्ये चकमक झाली. भारतीय लष्कराच्या दोन कॅप्टन सहित चार जवान या चकमकी दरम्यान शहीद झाले. 
Security forces clash with terrorists in Jammu and Kashmir, 4 martyred
जम्मू काश्मीर येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज नऊ वाजता दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली त्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली. याच वळी झालेल्या चकमकीमध्ये दोन कॅप्टन आणि दोन जवान असे चार जणांना प्राण गमवावे लागले आहेत. 

घटना घडली त्या ठिकाणी दोन दहशतवादी असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. धर्मसालच्या बाजीमल भागात शोध मोहीम सुरू असताना सुरक्षा दलात आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमक चालू झाली. यावेळी झालेल्या गोळीबारामध्ये दोन जवान आणि दोन अधिकारी यांनी आपले प्राण गमावले असल्याची माहिती अधिकारी यांनी दिली.

लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांसह पॅराट्रूपर्स सुद्धा या शोध मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. लष्कराचे जवान दहशतवाद्यांजवळ जातात लष्करी जवानांवर गोळीबार दहशतवाद्यांकडून करण्यात आला. यावेळी दोन कॅप्टन दर्जाचे अधिकारी आणि जवान हुतात्मे झाले तर जखमी जवानास उपचार करण्यासाठी म्हणून उदमपूर येथे नेण्यात आले.

मागच्या नऊ तासापेक्षा अधिक काळ या ठिकाणी चकमक चालूच असून येथील परिसरात सुरक्षा दलाने वेढा घातला आहे. राष्ट्रीय रायफल्सचा एक कॅप्टन आणि पॅराट्रूपर्सचा दुसरा कॅप्टन यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. पॅराट्रूपर्सचे एक सार्जंट देखील या ठिकाणी शहीद झाले आहेत.

पाच दिवसांपूर्वी कुलगाममध्ये लष्कराच्या कारवाईत 5 दहशतवादी ठार झाले होते.