Bihar News: आईचं नाव ज्ञानती देवी असं आहे. भरत यादव हे त्यांचे पती एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांचं लग्न 2013 मध्ये झालं. 2015 साली गौना प्रथेनुसार ज्ञानती देवी सासरी राहिला गेल्या. त्यांच्या लग्नाला 3 वर्षे उलटूनही त्यांना बाळ झालं नव्हतं. गर्भधारणेसाठी त्यांनी जवळच्याच एका डॉक्टरांकडे उपचार सुरू केले.
ज्ञानती देवी यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव त्यांनी चांदणी असं ठेवेल. आता चांदणी 3 वर्षांची आहे. ज्ञानती देवींना चांदणीच्या जन्मानंतर अडीच वर्षांनी एक मुलगाही झाला. या 2 मुलांनंतर आता त्यांनी एकत्र चक्क 4 मुलांना जन्म दिला आहे.
आता भरत यादव आणि ज्ञानती देवी भरत यादव हे एकूण 6 मुलांचे पालक झाले आहेत. त्यामुळे अत्यंत आनंदाचा वातावरण त्यांच्या घरात आहे.भरत यादव यांनी सांगितलं की आपल्या सर्व मुलांना चांगलं शिक्षण देऊन एक चांगला नागरिक बनवणार.