एक दिवशीय सामन्यामधलं विराट कोहलीच हे 49 व शतक ठरल आहे. परिस्थितीचा अंदाज घेत केलेल्या संयमी खेळामुळे विराट कोहलीने भारताला 326 धावा काढून देत आपले शतक देखील पूर्ण केलं. मैदानात दक्षिण आफ्रिकेचा संघ 327 धावा करण्यासाठी उतरला होता मात्र दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 83 धावावर सर्व बाद करत हा सामना भारताने 243 धावांनी जिंकला. वर्ल्ड कप 2023 मधील हा भारताचा आठवा विजय ठरलेला आहे.
विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
विराट कोहली ना आपलं 49 वा शतक पूर्ण करत सचिन तेंडुलकरच्या विक्रमासोबत बरोबरी केली हे पाहून अनेकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर स्वतः सचिन तेंडुलकर ते माजी क्रिकेटपटू रिकी पॉंटिंग इथपर्यंत विराट कोहली चे कौतुक केल आहे. वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या रिकी पॉंटिंग विराटच कौतुक केला आहे. त्याच्या वाढदिवसा दिवशी त्यांनी केलेले हे शतक पाहून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच लवकरच विराट कोहली 50 वा एक दिवशी शतक करत सचिनचा विक्रम मोडीत काढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या सगळ्या चर्चेवेळी रिकी पॉंटिंग दिलेली प्रतिक्रिया सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
सचिन आणि विराट यांच्या विरुद्ध खेळलाय पॉण्टींग
-
रिकी पॉंटिंग चा समावेश विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर या दोन्ही खेळाडू विरोधात खेळलेल्या ऑस्ट्रेलियाच्या काहीच खेळाडूंमध्ये होतो. सचिन विरुद्ध खेळत असताना स्वतःच्या नेतृत्वगुणांनी मॅच आपल्या बाजूला वळवण्याची धमक रिकी पॉंटिंग कडे होती. तर विराट कोहली चा टीम इंडिया मध्ये समावेश असलेल्या भारताच्या संघाविरुद्ध देखील चमकदार कामगिरी करताना दिसत होता. रिकी पॉंटिंग च्या मनामध्ये या दोन्ही खेळाडूनबद्दल भरपूर आदर आहे. या दोघांपैकी उत्तम कोण या विषयावर बोलत असताना रिकी पॉंटिंग ने त्याचा मत विराटच्या बाजूने टाकल आहे.
सचिनचा विक्रम मोडण्याची गरज नाही
विराट कोहली हा सर्वोत्तम खेळाडू आहे याबाबत काही शंका नाही याआधीही रिकी पॉंटिंग विराट कोहली बद्दल बोलला आहे. तो म्हणतो सचिनच्या विक्रमासोबत विराट कोहलीला बरोबरी करायची गरज नाही. सचिनचा विक्रम मोडायची ही विराट कोहली ला गरज नाही. कारण त्याच्या केवळ फलंदाजीची एकंदरीत आकडेवारी पाहिली तर ती अविश्वसनीय आहे असे आपल्याला दिसेल सचिन इतकेच 49 शतक विराट कोहलीने 175 डाव कमी खेळून काढले आहेत हा विचारच विश्वसनीय आहे असा रिकी पॉंटिंग आयसीसीशी बोलताना विराटचा कौतुक करत म्हटलं आहे.
सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट
क्रिकेट वर्ल्ड कप 2023 या टूर्नामेंटमध्ये विराट कोहली चे नाव यशस्वी फलंदाजांची यादीत घेतलं जात आहे आत्ताच्या घडीला विराट कोहली सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज यादीत दुसऱ्या स्थानावर आहे तर क्विंटन डी कॉक हा विराट पेक्षा 7 धावांनी पुढे आहे.
वर्ल्ड कप 2023 मध्ये विराट कोहलीने साखळी फेरीत भारताचा अजून एक सामना शिल्लक असताना 543 धावा पूर्ण केल्या आहेत यात त्यांनी चार अर्धशतक आणि दोन शतक मारले आहेत.
वर्ल्ड कप 2023 मध्ये विराट कोहली चा करिष्मा अजून संपलेला नाही असं रिकी पॉइंटिंग म्हणाला आहे विराट कोहली सचिनच्या विक्रमासोबत बरोबरी करण्यासाठी जास्त कष्ट घेतला आहे आता अपेक्षेचा वजन त्याच्या मानेवरून उतरला आहे आणि एका योग्य वेळेमध्ये तो यामधून बाहेर पडला आहे आता लास्ट सामन्यानंतर सेमी फायनल मध्ये भारत खेळणार आहे भारतासाठी आणि विराट साठी हा एक उत्तम दिवस होता, असं रिकी पॉंटिंग म्हणतो.