आशा वर्कर ह्या एक प्रशिक्षित महिला सामुदायिक स्वास्थ कार्यकर्ता असतात. यांचं काम ग्रामीण आणि शहरी क्षेत्रातील लोकांना विविध स्वास्थ सेवा देणे असते. 
Good News for Aasha Workers

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या आशा वर्कर्स ना दिवाळीनिमित्त 20% मानधनात वाढ करण्यात आली आहे. यामुळे 6 हजार रुपये इतकी रक्कम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर करण्यात आल्याची माहित माजी महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.  

कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांमध्ये कार्यरत असलेल्या आशा वर्कर्स ना आणि अशा गटप्रवर्तक यांना 5000 रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

आशा वर्कर ह्या प्रशिक्षित महिला असून सामुदायिक स्वास्थ कार्यकर्ता म्हणून ते काम करत असतात. शहरी क्षेत्रात आणि ग्रामीण क्षेत्रात लोकांना वेगवेगळ्या स्वास्थ सेवा देणे हे त्यांचं काम असतं. 

त्यांच्या कामापैकी प्रमुख कामे म्हणजे साथीच्या रोगांबाबत जनजागृती करणे उपचारासाठी मदत करणे, माता आणि बाल आरोग्य विषयी प्रबोधन करणे. कुटुंब कल्याण योजनेचा प्रचार करणे, साथींच्या रोगांच्या काळामध्ये लसीकरण टेस्टिंग ट्रेसिंग या कार्यांमध्ये सहभागी होणे.