शालिनी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत करणार गौरी आणि जयदीप च्या प्रेमाचा शेवट.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' त्या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू ,माधवी निमकर, मंदार जाधव, सुनील गोडसे, वर्षा उसगावकर ,आणि मीनाक्षी राठोड असे तगडे कलाकार मंडळी या मालिकेत दिसत आहेत. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मात्र काही दिवसापासून मालिका बंद होईल अशी चर्चा सगळीकडे होत आहे.
पण ही मालिका बंद होणार नसून प्रेक्षकांच्या भेटीला वेगळ्या वेळेत येणार आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही लोकप्रिय मालिका आत्ता तब्बल 900 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. या मालिकेतील कलाकारांचा सध्या सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. पण आता गौरी जयदीपच्या प्रेमाचा शेवट शालिनी करताना दिसणार आहे.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ही मालिका 2020 ला सुरू झाली होती. प्रेक्षकांच्या मनात या मालिकेने अल्पावधीत काळातच स्थान निर्माण केलं होतं. प्रेक्षकांच्या मनावर या मालिकेतील जयदीप गौरी मल्हार शालिनी माई देवकी अशी पात्र अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिल्यामुळे १००, २००, ५०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे तसेच आता या मालिकेचे तब्बल 900 एपिसोड पूर्ण झाले आहेत.प्रेक्षकांचे आभार व्यक्त करत ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट शेअर केली आहे.
त्या मालिकेतील कलाकारांचे फोटो स्टार प्रवाहने शेअर करून लिहिलं आहे की, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा 900 वा भाग आज सादर होत आहे. सर्व प्रेक्षकांनी 900 भागांच्या प्रवासात मोलाची साथ दिली असून भरभरून प्रेम देखील केले आहे याबद्दल मनपूर्वक आभार... या मालिकेचे दिग्दर्शक निर्माते कलाकार तंत्रज्ञ या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन असून यांचे आभार देखील आहे. देवाकडे हीच प्रार्थना आहे की आत्तापर्यंत दिलेली साथ आणि प्रेम असंच पुढे देत राहो...
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील शालिनी गौरी-जयदीपला वेगळं करण्यासाठी अनेक प्लॅन केले. पण तिचा कोणताही प्लॅन यशस्वी झाला नाही. शालिनीचे प्रत्येक डाव गौरी जयदीपने उधळून लावले. जयदिप गौरी या दोघांच्या प्रेमाचा शेवट अखेर आता शालिनी करणार असल्याचा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.‘मराठी टीव्ही इन्फो’ या इन्स्टाग्राम पेजवर याचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.