आधार समानार्थी शब्द मराठी | Aadhaar Synonyms Marathi

आधार या मराठी शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीवर वस्तूवर दुसरी कोणतीही वस्तू आधारलेली असेल असा होतो. वाक्यात उपयोग करायचं म्हटलं तर वेली हा झाडाचा आधार घेतात असा करता येईल. आधार या शब्दाचा दुसरा अर्थ उदरनिर्वाहाच्या साधनाची मदत असाही होतो. याचा वाक्यात उपयोग करत असताना आई-वडिलांना म्हातारपणे मुलांच्या आधारावर जगावं लागतं. असा करता येईल. आधार या शब्दाचा तिसरा अर्थ पुरावा असा देखील होतो. उदाहरण, कागदपत्रांच्या आधारावर आपण कोर्टात न्याय मागू शकतो.

Adhar. Samanarthi Shabd Marathi 

आधार या मराठी शब्दाला समानार्थी शब्द मराठी भाषेत अनेक आहेत. पुरावा हा शब्द आधार या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. प्रमाण हा शब्द देखील आधार या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. आडोसा हा शब्द देखील आधार या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. आसरा, आश्रय हे दोन्ही शब्द देखील आधार या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. अधिष्ठान हा शब्द देखील आधार या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो.