Abdul Razzaq Controversial Statement: 
विश्वचषक 2023 या स्पर्धेमधून पाकिस्तान बाहेर पडला आहे. विश्वचषकामध्ये पाच वेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांच्या आव्हान संपुष्टात आले हे आव्हान संपुष्टात आल्याने त्यांचा संघ मायदेशात परतला आहे. खराब कामगिरीवर भाष्य करत असताना पाकिस्तान येथील माजी क्रिकेटपटूने भारतीय अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यावर वादग्रस्त व्यक्त केल आहे.

Netizens have reacted angrily to Abdul Razak's statement on social media.

पाकिस्तान पॉईंट टेबल मध्ये पाचव्या स्थानावर राहिल्यामुळे विश्वचषक 2023 मधून बाहेर पडला. पाकिस्तानचा संघ बाहेर पडल्यानंतर माजी क्रिकेटपटूच्या निशाणावर क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तानचे खेळाडू हे दोन्ही आहेत. पाकिस्तान मधल्या एका कार्यक्रमांमध्ये माजी खेळाडू अब्दुल रजाक याने त्यांच्या खेळाडूंच्या खराब कामगिरीवर लाजिरवाणं विधान करत भाष्य केलं.

त्याने केलेले ह्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याच्यावर आता नेटकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिले आहेत. सदर कार्यक्रमांमध्ये अब्दुल रजाक सोबत उमर गुल आणि शाहिद आफ्रिदी हे देखील होते.

अब्दुल रजाक म्हणाला, स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी नीतिमत्ता चांगली असायला हवी. तुम्ही विचार करताय की ऐश्वर्या राय सोबत लग्न करीन आणि संस्कारी सर्वगुणसंपन्न मुले जन्माला येतील असं काही होत नाही त्यासाठी प्रथमतः नीतिमत्ता बदलावी लागेल. रजाक च्या या वक्तव्यानंतर त्या स्टेजवर असलेले पाकिस्तानचे माजी खेळाडू हसू लागले. जसा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला तसे नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केल्या.

पॉइंट टेबल मध्ये पाकिस्तानने लीग मधील नऊ पैकी चार सामने जिंकत 8 गुण मिळवले. त्यामुळे पाकिस्तानला पाच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या खराब कामगिरीमुळे पाकिस्तानी क्रिकेटचे फॅन असलेले नाराज झालेले आहेत असे बोलले जात आहे. बाबर आझमच्या नेतृत्वावर पाकिस्तानच्या माजी खेळाडूनी टीका केली आहे. 
(क्रिकेटच्या ताज्या बातम्या)