तमिळ मधला सुपरस्टार सूर्या हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याचा अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका सीनच शूटिंग करत असताना शूटिंग करणारा कॅमेरा त्याच्या अंगावर पडल्याची दुर्घटना घडली आहे. झालेल्या अपघातामुळे तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या टीमने अपघातानंतर तातडीने रुग्णालयामध्ये त्याला दाखल केल आहे.
तमिळ चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेता सूर्या हा चेन्नईमध्ये कंगुवा या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. या चित्रपटाचा शूटिंग चालू असताना कॅमेरा त्याच्या अंगावर पडला आहे. अभिनेता सूर्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार चालू असून अधिक माहिती अद्यापही समोर आली नाही.
सूर्याची तमिळ आणि तेलगू इंडस्ट्रीज प्रचंड प्रसिद्ध आहे. टॉलीवूड मध्ये त्याने अनेक चित्रपट आहे केली असून त्याचा प्रत्येक सिनेमा हा तेलगू भाषेत सुद्धा डब केला जातो. अॅक्शन डायरेक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले शिवा हे त्याच्या आगामी कंगुवा या सिनेमाचं दिग्दर्शन करीत आहेत.
कंगुवा या सिनेमांमध्ये दिशा पटानी मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत असून ऐतिहासिक पाहणीवर हा चित्रपट आधारित आहे हा चित्रपट 38 भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे आता अभिनेता सूर्या याच्या दुखापतीमुळे या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आणखी उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.