अंदाज हा शब्द मराठीत वापरला जातो या शब्दाचा अर्थ एखाद्या गोष्टीबद्दल निश्चित असे विधान न करणे. अंदाज या शब्दाचा दुसरा एक अर्थ भविष्य वर्तवणे असा होऊ शकतो. वाक्यात उपयोग करून सांगायचं म्हणजे पावसाबद्दल आपण केवळ अंदाज व्यक्त करू शकतो असे उदाहरण देता येईल. म्हणजे पाऊस पडेल की नाही याबद्दल निश्चित सांगता येत नाही म्हणजेच अंदाज होय.
Andaj Samanarthi Shabd In Marathi
अंदाज या मराठी शब्दाला समानार्थी शब्द अटकळ असा आहे. तर्क हा शब्द अंदाज या शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. अनुमान हा शब्द देखील अंदाज या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. कयास या शब्दाचा समानार्थी शब्द अंदाज आहे. अटकळ या शब्दाचा समानार्थी शब्द अंदाज हाच आहे. अजमास/ अदमास हे शब्द देखील अंदाज या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. ठोकताळा हा शब्द अंदाज या शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. अडाखा/आडाखा या शब्दाचा समानार्थी शब्द अंदाज हाच आहे. तर अंदाज या शब्दासाठी होरा हा देखील शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरतात.