आता पावसाळा संपला दिवाळी संपली आणि आता लगीन सराई चालू झाली. ज्यांची लग्न ठरले आहेत त्यांच्या घरी आता लग्न करायची लगबग चालू झाली आहे. आणि ज्यांची अजून ठरायचे आहेत त्यांनी सुद्धा बघायचा जोर धरला आहे. बाजारपेठा सुद्धा लगीन सराईच्या वस्तूंनी गजबजलेले आहेत.
यावर्षी मराठी सेलिब्रिटीने सुद्धा आपल्या प्रेमाची कबुली देत लग्न करण्याचे सांगितले आहे. अलीकडेच बिग बॉस मधली अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचे लग्न झाल आहे. यांच्या लग्नाचे फोटो आणि लग्नापूर्वीच्या कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओज व्हायरल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सा रे ग म प लिटल चॅम्प्स मधली मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांचे देखील काही महिन्यांपूर्वी प्रेमाचा कबुलीच्या बातम्या समोर आल्या होत्या. तर आता मराठी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून लोकप्रिय झालेल्या एका कलाकाराचा साखरपुड्याचे फोटोज समोर येत आहेत.
निरागस आणि सुंदर अभिनयाने बालकलाकार म्हणून अभिनेता अनुराग वरळीकर यांना बऱ्याच मराठी चित्रपटात प्रेक्षकांची मन जिंकण्याचे काम केले होते. तर मोठे झाल्यावर सुद्धा बऱ्याच मालिकांमध्ये सिनेमांमध्ये त्यांना काम केलं आहे. तोच अनुराग आता आयुष्यातल्या नव्या प्रवासास सुरुवात करतोय. त्यानं जवळची मैत्रीण असलेल्या पायल साळवी सोबत साखरपुडा केला आहे.
साखरपुड्यात त्याचे कुटुंबीय जवळचे मित्र हे सर्वजण उपस्थित होत. सध्या अनुरागच्या या साखरपुड्याचे फोटोज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनुरागने साखरपुड्यात काळा सूट, पांढरा शर्ट आणि गळ्यात बो असा लूक धारण केला होता.
देवकी या सिनेमात त्याने बालकलाकार म्हणून आपलं काम चालू केलं होतं. या चित्रपटानंतर त्यानं पोर बाजार निवडुंग पारायण मिशन चॅम्पियन यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांन काम केलं आहे. झी मराठी या वाहिनीवर दे धमाल या मालिकेत त्याने बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती आणि प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं होतं. तर झी युवा या वाहिनीवर डॉक्टर डॉन या मालिकेत श्वेता शिंदे यांच्या मुलाच्या भूमिकेत अनुराग दिसला होता.
आता अनुरागच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचत आहेत. आणि हे फोटोज त्याच्या चाहत्यांना देखील पसंत येत आहेत आता तो लगीनगाठ कधी बांधतो याची उत्सुकता सर्व चाहत्यांना लागली आहे.