बांबू समानार्थी शब्द मराठी | Synonyms of bamboo in Marathi

बांबू हा शब्द मराठी भाषेमध्ये प्रचलित आहे. हे एका वनस्पतीचे नाव असून ही वनस्पती उष्णकटिबंधीय वातावरणामध्ये वाढते. बांबू हे सरळ आणि उंच जातात याचा उपयोग झोपडी बांधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी काठी म्हणून आधारासाठी केला जातो. बांबूचा उपयोग बागांमध्ये जास्त होतो. वेलींना, झुडपांना आधार देता यावा यासाठी बांबूचा उपयोग केला जातो.

Bambu Samanarthi Shabd In Marathi

बांबू या शब्दाला मराठी भाषेत समानार्थी शब्द वेळू असा आहे. वेत हा शब्द देखील बांबू या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. चिव्या हा शब्द बांबू या शब्दाला समानार्थी शब्द आहे. कळक हा शब्द देखील बांबू शब्दासाठी समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो. 

बांबू हे एक गवत वर्गीय वनस्पती असून याचा उपयोग बऱ्याच ठिकाणी केला जातो घरे बांधण्याकरता झोपड्या बांधण्याकरता याचा जास्त उपयोग केला जातो. तर याचे चटया बुरुडकाम यासाठी देखील उपयोग केला जातो. कागद तयार करण्यासाठी बांबू चा उपयोग जास्त होतो. 

इतर समानार्थी शब्द मराठी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.