बिरसा मुंडा जयंती मराठी | Birsa Munda Jayanti Marathi

बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड राज्यातील उलिहातू या गावी झाला होता. बिरसा मुंडा यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कूल मध्ये झाले. बिरसांचा स्वभाव मिळून मिसळून राहण्याचा असल्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्काने समविचारी सहकाऱ्यांचे संघटन केले. 
बिरसा यांचे वडील सुगन मुंडा यांची इंग्रजांनी जबरदस्तीने धर्मांतर केले होते त्यामुळे ख्रिस्ती मिशनऱ्यांचा आणि इंग्रजांचा बिरसा यांना राग होता.
इंग्रजांकडून अशिक्षित आदिवासींवर अत्याचार केला जात असे ते पाहून बिरसा यांना इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार आला. गोडगेडा येथील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानत बिरसा मुंडा यांनी त्यांचा आशीर्वाद घेत इंग्रज सरकारच्या अन्यायविरोधात छोटा नागपूरच्या प्रदेशात इसवी सन 1895 या वर्षी लढा उभारला.

इंग्रजांनी या कारणामुळे त्यांना अटक केली आणि तुरुंगात त्यांचा अतोनात छळ केला बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहामध्ये 9 जून 1900 या दिवशी मृत्यू झाला लोकांनी बिरसा मुंडा यांना जननायक हा किताब बहाल केला आहे.