'झिम्मा २' चा सध्या सगळीकडे फिव्हर आहे.प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा महिलांचं भावविश्व या चित्रपटात उलगडलं जाणार आहे. 'झिम्मा' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या धुमाकूळ घातला होता.चित्रपटगृहाबाहेर हाउसफुलची पाटी या चित्रपटाने झळकवली होती. कल्ला करायला आता 'झिम्मा २' तयार आहे. चित्रपटाच्या कलाकारांमध्ये मात्र यावेळेस बदल करण्यात आला आहे.या चित्रपटात दोन नवे चेहरे दिसत आहेत.मात्र या चित्रपटात जुने दोन चेहरे नाहीत.चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेता हेमंत ढोमे याने यामागचं कारण सांगितलं आहे.
>हेमंत ढोमे हा लोकमत फिल्मी ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला,' खर सांगतो मला एक तर पार्ट २ करायचा नव्हता. मी पार्ट २ ला विरोधच करत होतो. क्षितीने मात्र माझं मन बदललं.क्षितीने सांगितलं की आपल्या आधीच्या चित्रपटातली पात्र काय करत असतील? इंदू आता पंच्याहत्तर वर्षांची होईल. कबीर काय करत असेल? मुलांबरोबर इंदूचं जमल असेल का? पार्ट वन मधील कबीर आता काय करत असेल? तो काही इतक्या लवकर लग्न करणार नाही मग तो अजूनही फ्लॅट करत असेल का? मृण्मयीचं पात्र रमा ही तेव्हा बाळासाठी प्रयत्न करत होती. मग आपण भाग २ मध्ये तिला मूल झाले असं सांगू शकतो. आता पुढे काय होईल ते कदाचित भाग तीन मध्ये येईल. एवढ्या लांब ती मुलाला सोडून येऊ शकणार नाही.'
हेमंत पुढे म्हणाला, भाग एक मध्ये तर सोनाली म्हणजेच मैथिलीचे जे पात्र आहे त्याचा शेवट तरी गोड झालेला होता. तिच्यातला आणि तिच्या आई मधला दुरावा मिटलं होतं. सगळं नीट असताना उगीच काहीतरी ओढून ताणून अडचणी दाखवण्यात काहीच अर्थ नाहीये.
पार्ट १ मध्ये या कथेची काहीच गरज नाही त्यांच्या पात्रात सर्व काही नीट असताना सध्या त्याची गरज नाही म्हणून आता पुरती ही पात्र बाजूला ठेवूया.' ती पात्र बाजूला काढून त्यांच्या जागी शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरू या चित्रपटात नवीन पात्र दाखवण्यात येत आहेत. या चित्रपटामध्ये त्या दोघीही धमाल आणताना दिसत आहेत.