Zee Marathi: झी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला 'जाऊ बाई गावात' हा नवीन रियालिटी शो घेऊन येत आहे. ऐशोआरामात राहिलेल्या शहरातल्या तरुणींना गावाकडे राहुन या रिऍलिटी शोमध्ये दाखवायचं आहे. जी स्पर्धक योग्यपद्धतीने हे चॅलेंज पेलेल ती या शोची विजेती ठरणार आहे.
हा खेळ येत्या ४ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता प्रसारित होत आहे. नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला या शोचे गावरान बाज असलेले भन्नाट शीर्षक गीत आले आहे.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
लोकांकडून त्याला चांगली पसंती देखील मिळत आहे. दरम्यान या शोमध्ये सूत्रसंचालन हार्दिक जोशी करताना दिसणार आहे. तो वेगवेगळे चॅलेंजेस शोमध्ये असलेल्या स्पर्धकांना समजावून सांगणार आहे. त्यामुळे या शोची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे.
त्याच्या वहिनीची हार्दिक जोशीने हा शो स्वीकारावा म्हणून मनापासून इच्छा होती. एक भावनिक पोस्ट गटाने सोशल मीडियावर शेअर केली आहे. हार्दिक ने लिहिले की आपल्यात आज वहिनी नाही पण आपण हा शो तिची इच्छा होती म्हणून स्वीकारत आहे. हार्दीकच्या वहिनीच नाव ज्योती असे आहे. हार्दिक बहिणीच्या खूप क्लोज होता.
ज्योती वहिनीने त्याच्यावर अगदी मोठ्या बहिणीसारखी माया लावली होती. हार्दिक जोशी वहिनीच्या आठवण येत भाऊ कोण म्हणतो की, “ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीयेस पण तूझ अस्तित्व आमच्यात कायम राहील.. झी मराठीवरील जावई गावात हा जो नवीन शो मी करत आहे तो शो फक्त तुलाच पूर्ण शो मी डेडिकेट करतोय.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
कारण तू म्हणली होतीस की हार्दिक काही झालं तरी हा शो तू करणारच आहेस हे वाक्य तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होतं. हा शो टीव्हीवर योगायोग असा आहे की 4 डिसेंबरच्या दिवशी दिसायला सुरुवात होणार आहे.
तुझा वाढदिवस देखील त्याच दिवशी आहे. तुला नमस्कार करून मी नेहमी कामाला जायचं तेव्हा माझ्या डोक्यावर हात फिरवून तू मला आशीर्वाद द्यायची ..तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे… मी जे काही आज आहे त्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. तु सदैव माझ्या पाठीशी आई बहीण मैत्रीण म्हणून कायम सोबत होतीस तर आत्ता सुद्धा तू तशीच कायम माझ्यासोबत राहा ही विनंती करतो. कायम मला तुझी उणीव भासत राहील. Miss you @jyoti.naisha i माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको Always love you always khup khup miss you”
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉
Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉
Join Now