Boyz 4 Box Office Collection: बॉईज 4 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटला येऊन आता दहा दिवस पूर्ण झाले आहेत चला तर आता जाणून घेऊया या चित्रपटाचे नेमकं कलेक्शन झालय तर किती? 
बॉईज, बॉईज 2, बॉईज 3 या चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. हे तीन चित्रपटानंतर आणखी एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे तो म्हणजे बॉईज 4. 20 सप्टेंबर रोजी हा नवीन चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटांमधील कलाकारांच्या अभिनयाने चित्रपटांमधील गाणी व चित्रपटांमधील संवाद यांनी प्रेक्षकांचं मन जिंकल. ढुंग्या,कबीर,धैर्या त्यांच्या गॅंग मध्ये बॉईज 4 या चित्रपटात नवीन बॉईज ही सहभागी झाले आहेत.  'बॉईज 4' (बॉईज 4)हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊन आता दहा दिवस झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या चित्रपटान किती कमाई केली आहे.
बॉक्स ऑफिस कलेक्शन

 'बॉईज 4' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत पार्थ भालेरावनं (Parth Bhalerao) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन सांगितलं आहे. 4.20 कोटींची कमाई या चित्रपटाने दहा दिवसातच केली आहे."बॉईज येणार तर बॉक्स ऑफिसवर पण राडा होणार! हे कॅप्शन या पोस्टला दिली. 'Boyz 4' जी सुपरहिट धमाकेदार कमाई...."

'बॉईज 4' ची स्टार कास्ट

पार्थ भालेराव,प्रतिक लाड ,सुमंत शिंदे यांच्यासोबतच निखील बने, रितुजा शिंदे,गौरव मोरे, ऋतिका श्रोत्री,जुई बेंडखळे ,अभिनय बेर्डे यांनी 'बॉईज 4' या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.यतीन कार्येकर, गिरीष कुलकर्णी, ओम पाटील,समीर धर्माधिकारी यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

'बॉईज' हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर 'बॉईज 2' हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता. तर 2022 मध्ये 'बॉईज 3' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. 20 ऑक्टोबर 2023 रोजी 'बॉईज 4' हा चित्रपट रिलीज झाला आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं धुमाकूळ घातला आहे.

बॉईज- 4 या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल सखाराम देवरूखकर यांनी केलं आहे. हृषिकेश कोळी यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया ,सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रेक्षकांची मनं चित्रपटातील 'ये ना राणी तू ये ना ' या गाण्यांनी जिंकली आहे. प्रेक्षकांना 'बॉईज- 5' हा चित्रपट कधी बघायला मिळणार याची उत्सुकतेने वाट बघत आहेत.