Chatrapati SambhajiNagar: कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांच्या घरी मंगलकार्य असून मुलगा ॲड अब्दुल अमेर यांचा विवाह सोहळा होत आहे. हा विवाह सोहळा छत्रपती संभाजीनगर येथे होत असून बीड बायपास रोडवर असलेल्या एका लॉनमध्ये हा विवाह सोहळा सायंकाळी होणार आहे. विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत मंत्रिमंडळातील बरेच दिग्गज उपस्थित राहणार आहेत. सर्वच क्षेत्रातील मान्यवर, बरेच आमदार आणि खासदार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
रविवारी, 19 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी हा विवाहा सोहळा होणार असून अब्दुल अमेर याचा निकाह नाशिक जिल्ह्यातील येवला येथील वधूशी होत आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सुरक्षेसाठी म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. ते सायंकाळी 5 वाजता मुंबई विमानतळावरुन छत्रपती संभाजीनगरकडे येणार आहेत. लग्नसोहळ्यानंतर मुख्यमंत्री परत मुंबईला जाणार आहेत.
अब्दुल सत्तार यांनी एप्रिल 2018 मध्ये मुलीच्या लग्नासोबतच गरीब कुटुंबातील 555 मुलींचे लग्न लावले होते. हा विवाह सोहळा एकाच मांडवात झाला. मुलीच्या लग्नातच सामूहिक विवाह सोहळा केल्याने सामाजिक बांधिलकी बद्दल सगळीकडे चर्चा सुरू होती.