timed out angelo mathews: क्रिकेट वर्ल्ड कप 2023 ची यजमानपद यावर्षी भारताकडे आहे. या वर्ल्डकप मधील आज दिल्लीमध्ये सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या दरम्यान होत आहे. या सामन्यामध्ये असं काही आश्चर्यकारक घडला आहे जे या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीच घडलं नाही. आज झालेल्या बांगलादेश श्रीलंका (ban vs sl) मॅच च्या दरम्यान खेळायला मैदानात यायच्या अगोदरच आऊट देण्यात आले.
आज दिल्ली येथे चालू असलेल्या श्रीलंका बांगलादेश (bangladesh vs sri lanka) यांच्या दरम्यान च्या मॅच मध्ये श्रीलंकेचा खेळाडू अँजेलो मॅथ्यूज मैदानात आलेल्या आऊट देण्यात आले. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजला पंचांनी टाईम आऊट मुळे आउट दिले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडली आहे. चौथ्या विकेट नंतर मॅचला मैदानात येण्यासाठी उशीर झाला. आणि या कारणामुळेच शाकिब अल हसन या बांगलादेशच्या खेळाडूने आऊटसाठी अपील केले. त्यामुळे अंपायर ने त्याला आउट दिले.
काय आहे नियम?
What is time out in cricket in Marathi: क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज आऊट झाल्यानंतर पुढील 3 मिनिटाच्या आत मध्ये पुढील खेळाडूंनी मैदानात यावे लागते. (timed out meaning in cricket) मात्र आजच्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश मॅच मध्ये अँजेलो मॅथ्यूजला (mathews timed out) मैदानात येण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळेच शाकिब अल हसनने आऊटसाठी अपील केले त्यावर अंपायरन आऊट दिला आहे.
श्रीलंकेचा संघ 279 धावांवर ऑलआऊट
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या वनडे वर्ल्ड कप 2023 च्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यांमध्ये श्रीलंकेचा संघ 279 धावांवर सर्व बाद झाला. बांगलादेश ला विजयासाठी आता 280 धावा करण्याची गरज आहे. श्रीलंकेकडून 108 धावांची खेळी चरिथ असलांकाने केले. त्याने 6 फोर आणि 5 सिक्स लगावत ही खेळी केली. पाथूम निसंकाने 41 धावा काढल्या आहेत.
बांगलादेशकडून तंजिम हसन शकीबने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या आहेत. शोरीफूल इस्लाम आणि शकीब हल-हसनने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.