मागील चार वर्षात पहिल्यांदाच दूध उत्पादकांना भयंकर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. खाजगी आणि सहकारी संघांनी शनिवारपासून गाईच्या दुधाच्या दरात एक रुपयांनी परत एकदा कपात केली. या अगोदर एक नोव्हेंबर रोजी कपात करण्यात आली होती. एक नोव्हेंबर पासून लगेच पाच दिवसात पुन्हा एक रुपये दर कमी करण्यात आला. तर या दहा दिवसांमध्ये ही तिसऱ्यांदा दर कपात करण्यात आली आहे.
मागील चार वर्षांमध्ये नैसर्गिक संकटांना सामोरे जात दूध उत्पादकांनी प्रचंड नुकसान सोसले होते तरी देखील गोठे जिवंत ठेवले होते. या वर्षांमध्ये दरामध्ये सुधारणा होत होती तितक्यात हा आनंद हिरावून घेतल्यासारखे होत आहे. महाराष्ट्रातील खाजगी दूध संघांनी जुलै महिन्यामध्ये दुधाचे दर पाडण्यास सुरुवात केले होते.
दुधाचे दर ठरवण्यासाठी चार महिन्यापूर्वी राज्य दूध दर नियंत्रण समितीची स्थापना राज्य सरकारकडून करण्यात आली होती. मात्र समितीला दुधाच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचे कोणतीही अधिकार न दिल्याने ही समिती म्हणजे फक्त कागदावरच उरली आहे.
महाराष्ट्रातील एकूण दुधाच्या उत्पादनापैकी खाजगी संस्थांकडून 70 टक्के दूध संकलित केले जाते. इंदापूर तालुक्यात असलेल्या सोनाई दूध संघाचा दूध संकलनात सर्वाधिक वाटा आहे. सोनाईच्या धोरणांचा परिणाम महाराष्ट्रातील दूध व्यवसायावर होत आहे. Farmers News
गाईच्या दुधाला काही खासगी आणि सहकारी संघाने 26 रुपये इतका दूध दर देत आहेत. मात्र वेगळ्या राज्यात असलेल्या डोडला यासारख्या संघानी 32 रुपये गायीच्या दुधाला दर दिला आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना लुबाडणाऱ्यांचा गट तयार झाले आहेत असे आरोप राज्यांमध्ये होत आहेत. (Milk news)
गायीच्या दुधाला असलेले महिन्यावारी कपात झालेले दर
- एप्रिल : प्रति लिटर ३८ रुपये
- ऑगस्ट: प्रति लिटर ३४ रुपये
- 11 नोव्हेंबर : प्रति लिटर २६ रुपये
मागील नऊ महिन्यांमध्ये तब्बल 12 रुपयाची कपात झाल्याचे या आकड्यांप्रमाणे दिसत आहे.