maxwell 200 runs: आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना झाला या सामन्यामध्ये ग्लेन मॅक्सवेलने तुफान 201 धावांची खेळी केली. 100 धावांवर सात विकेट असताना ऑस्ट्रेलियाकडून खेळताना ग्लेनने एकतर्फी खेळी करत जखमी असतानाही 201 ची खेळी केली आहे. जखमी मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावला. (maxwell today match)
पहिल्यांदा दुसऱ्या विनिंग मध्ये अफगाणिस्तानची टीम ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांना भराभर आउट करत होती मात्र ग्लेन मॅक्सवेलने 201 धावा करत ऑस्ट्रेलियाला जिंकून दिलं. मॅक्सवेल 201 धावा करण्यासाठी केवळ 128 बॉल वापरला आहे.
वन मॅन आर्मी: मॅक्सवेलने ठोकले द्विशतक
आज झालेल्या विश्व चषकाच्या 39 व्या सामन्यांमध्ये मॅक्सवेलच्या द्विशतकामुळे अफगाणिस्तानचा तीन गडी राखत ऑस्ट्रेलियाने पराभव केला. या सामन्यामध्ये वन मॅन आर्मी ग्लेन मॅक्सवेल ने अफगाणिस्तानच्या जबड्यामध्ये गेलेला विजय खेचून ऑस्ट्रेलियाला मिळवून दिला. मॅक्सवेल जखमी होता तरी देखील त्याने जबरदस्त खेळी करत 292 धावांच्या लक्षाचा पाठलाग एकट्या मॅक्सवेलने 201 धावा काढत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या विश्वचषकामधील त्याचे हे पहिलेच द्विशतक आहे. या द्विशतकामध्ये 21 चौकार आणि 10 षटकार त्याने ठोकले आहेत.
माझ्या आयुष्यातील ही सर्वोत्तम एकदिवसीय खेळी आहे: सचिन
ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने त्यांच्या एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्धच्या 201*(128) धावा करत विजय मिळवला यावर प्रतिक्रिया देताना सचिन तेंडुलकरने ट्विट केले., "माझ्या आयुष्यातील ही सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळी आहे." त्याने लिहिले, "मॅक्स प्रेशरपासून कमाल कामगिरीपर्यंत!" मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियनकडून सर्वाधिक एकदिवसीय धावसंख्या नोंदवली. (क्रिकेटच्या ताज्या बातम्या)
त्याने धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने X वर सांगितले की ग्लेन मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्या खेळीदरम्यान धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला. मॅक्सवेलने सामन्यात नाबाद 201 धावांची खेळी केली.
“हे लक्षात ठेवले जाईल,” असे अख्तर यांनी आपल्या ट्विटमध्ये जोडले. मॅक्सवेलच्या नाबाद 201 धावांमध्ये 21 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता.