मात्र ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स त्या दोघांनी विकेट न गम होता सामना आपल्या खिशात घालून घेतला. मॅक्सवेल ने या सामन्यांमध्ये नाबाद राहत 210 धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलियाकडून द्विशतक झळकवणारा मॅक्सवेल हा पहिला खेळाडू ठरला आहे. मॅक्सवेल ने कालच्या सामन्यांमध्ये 201 धावांची खेळी करत अनेक विक्रम मोडीत काढले आहे. या सोबतच आता सेमी फायनल मधील चार संघांपैकी केवळ एका संघासाठी आता जागा रिकामी आहेत.
-
शर्यतीत असलेले 4 संघ
Cricket World Cup 2023: ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना अफगाणिस्तानने गमावल्यामुळे अफगाणिस्तान गुणतालिकेत 8 राखत सहाव्या स्थानावर आहे. तर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर न्यूझीलंड व पाकिस्तान अनुक्रमे आहेत या दोन्ही संघाचे आठच पॉइंट आहेत. नेट रन रेट अधिक असल्यामुळे अफगाणिस्तान पेक्षा ते वरच्या स्थानावर आहेत. आता वरील तिन्ही संघाचे एक एक सामने शिल्लक आहेत त्यामुळे या तिन्ही संघांना पात्र ठरण्याची संधी अजूनही आहे. या तिन्ही संघाने त्यांचे उरलेले सामने जर जिंकले तर नेट रन रेट जास्त ज्या संघाचा असेल तो संघ चौथ्या स्थानावर निश्चित करण्यात येणार आहे. या तिन्ही संघाने त्यांचे शेवटचे सामने जिंकले तर दहा पॉईंट होतील अजून नेदरलँड चे दोन सामने बाकी आहेत त्यांनी हे दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे दहा पॉईंट होतील. आणि सेमी फायनल साठी पात्र होण्याच्या दृष्टीने या चारही संघांना नेमक आता काय करावे लागेल हे आपल्याला पाहावं लागणार आहे.
न्यूझीलंड(New Zealand)
ODI World Cup 2023: न्यूझीलंडचा आता शेवटचा एक सामना राहिला आहे त्यांना जर सेमी फायनल पात्र व्हायचं असेल तर त्यांना हा सामना जिंकावाच लागणार आहे त्यांचा हा लास्ट चा सामना श्रीलंका क्रिकेट संघाविरुद्ध होणार आहे.
पाकिस्तान(Pakistan)
पाकिस्तानला सिम फायनल मध्ये जाण्यासाठी त्यांचा शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे मात्र नुसता विजय मिळवलं म्हणून पात्र होणार नाही. न्यूझीलंडचा जर त्यांच्या शेवटच्या सामन्यामध्ये पराभव झाला तर पाकिस्तानला सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळणार आहे. नेट रन रेट मध्ये न्यूझीलंडला मागे टाकण्यासाठी पाकिस्तानला मोठ्या विजयाची गरज आहे जर या पद्धतीने झालं तरच पाकिस्तान सेमी फायनल मध्ये जाऊ शकतो. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तानचा शेवटचा सामना होणार आहे.
अफगाणिस्तान(Afghanistan)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तानचा जरी पराभव झाला असला तरी त्यांना सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी अजूनही संधी आहे पाकिस्तान शेवटचा सामन्यामध्ये मोठ्या फरकाने जिंकत न्यूझीलंडला रणरेटमध्ये मागे टाकल
-
तर अफगाणिस्तानच्या शक्यता निर्माण होऊ शकतात. पाकिस्तान न्यूझीलंडच्या सोबत असलेल्या सामन्यांमध्ये पराभूत झाले तरी अफगाणिस्तानला फायदाच होणार आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध शेवटचा सामना अफगाणिस्तानचा असणार आहे.
नेदरलँड(Netherlands)
ICC World Cup 2023: नेदरलँड क्रिकेट संघाला सेमी फायनल मध्ये पात्र होण्याची शक्यता कमीच आहे मात्र तरीदेखील ते दोन्ही मोठ्या फरकाने जिंकले तर त्यांचे चार गुन्हा सोबतच नेट रन रेटमध्ये सुद्धा वाढ होणार आहे आणि असंच घडल्यास हा नौका संघ सेमी फायनल साठी पात्र ठरू शकतो नेदरलँड चे शेवटचे दोन सामने इंग्लंड आणि भारताविरुद्ध अनुक्रमे होणार आहेत.
गुण तालिकेत भारत एक नंबर वर असून त्याखाली दक्षिण आफ्रिका आहे आणि त्याच्या खाली ऑस्ट्रेलिया आहेत हे तिन्ही संघ सेमी फायनल साठी क्वालिफाय झाले आहेत. तर सेमी फायनल च्या स्पर्धेमधून बांगलादेश श्रीलंका आणि इंग्लंड हे तिन्ही संघ बाहेर पडले आहेत.