क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताने आपला सलग आठवा सामना जिंकत 14 गुण मिळवले आहेत तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान चार मॅच जिंकत आठ गुण मिळवले आहेत. आणि गुणतालिकेत तो पाचव्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा सेमी फायनल मध्ये येण्याच्या आशा पुन्हा प्रज्वलित झाले आहेत.
सेमी फायनल साठी क्वालिफायर्स म्हणून भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ पोहोचला आहे. तर आता तिसऱ्या आणि चौथ्या जागेसाठी चार संघांमध्ये लढत होत आहे. त्यात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या चार संघांमध्ये चढाओढ सुरू आहे. सर्वांच्या आता एक - दोन मॅचेस राहिले आहेत.
-
-
त्यातच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठी भविष्यवाणी केली आहे. तो म्हणाला विश्वचषकामधील पहिला उपांत्य सामना पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये होऊ शकतो. कारण त्यांचा उरलेला एक सामना ते जिंकतील आणि उपांत फेरी गाठण्यात पाकिस्तानला येशील असं सौरव गांगुली यावेळी म्हणाला आहे.