आईसीसी वर्ल्ड कप 2023 इंडिया-साउथ अफ्रीका लाइव मैच: वर्ल्ड कप 2023 चे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना आज ईडन गार्डन कोलकत्ता येथे रंगला आहे. पहिल्यांदा टॉस जिंकत कर्णधार रोहित शर्मा ने फलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजी करत असताना भारतीय संघाने विराट कोहलीने आपल्या वाढदिवशी मारलेल्या शतकासह 327 धावांचा आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवल आहे.
इंडिया का मैच: भारताकडून फलंदाजी करत असताना विराट कोहलीने शानदार 101 धावांची खेळी केली. त्याचं हे शतक 49 वा आहे त्याने महान सचिन तेंडुलकर यांच्या 49 शतकांच्या विक्रमा सोबत बरोबरी केली.
-
-
श्रेयस आयरने विराट कोहलीला सहकार्य करत 77 धावा केल्या. त्यासोबत प्रथम फलंदाजीला आलेला रोहित शर्मा 40 धावा करत तुफान फलंदाजी केली त्याने 24 बॉल मध्ये 40 धावा केले आहेत. तर पाचव्या विकेट नंतर आलेला रवींद्र जडेजा याने विराट कोहलीला सहकार्य करत 29 धावा केल्या.
IND vs SA LIVE: दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॉन्सन, रबाडा, केशव महाराज यांनी एक एक विकेट घेतली आहे.