राज्यात असलेल्या एकनाथ शिंदे सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून एक जुलैपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार सातव्या वेतन आयोगानुसार एक जुलै 2023 पासून सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावर अनुज्ञेय महागाई भत्ता 42 टक्के असलेला महागाई भत्ता आता 46% करण्यात यावा. तर 1 जुलै 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीमधील थकबाकीसह नोव्हेंबरच्या वेतनासोबत महागाई भत्ता रोखीने देण्यात यावा असा निर्णय सरकारने घेतला. 

महागाई भत्त्याची ही रक्कम प्रदान करत असताना आत्ताच्या तरतुदी आणि कार्यपद्धती तशाच प्रकारे लागू राहणार आहेत. तर यावर होणारा खर्च हा वेतन आणि भत्ते या लेखाशीर्षाखाली लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येऊन त्यासाठी मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. 

वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता वाढत असतो. 1 जानेवारी आणि 1 जुलै अशा दोन तारखेला महागाई भत्ता वाढवण्यात येतो. याबाबतचा निर्णय उशिरा घेतला गेला आहे. एक जुलै बाबतचा शासन निर्णय आज घेण्यात आला आहे. त्यामुळे आता एक जुलैपासून चार टक्के महागाई भत्त्यात वाढ होईल असे नमूद करण्यात आला आहे. 

या चार टक्के वाढीचा फायदा आता शासकीय निमशासकीय कर्मचारी जिल्हा परिषदेचे कर्मचारी अशा सर्व राज्य कर्मचाऱ्यांना होणार आहे. तर जुलैपासून मागील चार महिन्यांचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरच्या पगारात मिळणार आहे. महागाई भत्ता पहिल्यांदा केंद्र सरकार जाहीर करते त्यानंतर राज्य सरकार निर्णय घेते.