बराच वेळा पती-पत्नीचे भांडण रस्त्यावर, घरामध्ये आणि वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये झालेले तुम्ही पाहिला असाल. मात्र चक्क विमानामध्ये देखील पती-पत्नीचे भांडण झाले असल्याचे तुम्ही पाहिले नाही. मात्र विमानामध्ये पती-पत्नीचे भांडण झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करत दिल्लीमध्ये विमान उतरवल्याची घटना समोर आली आहे.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
विमानामध्ये झालेल्या पती-पत्नीच्या भांडणामुळे परिस्थिती बिघडल्यावर दिल्ली मधल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. म्युनिकहून थायलंडची राजधानी बँकॉकला लुफ्थांसाचे फ्लाइट क्रमांक LH772 विमान चालले होते.
एएनआयने वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीचे भांडण झाल्यावर विमान दिल्लीकडे वळवण्यात आले. दिल्ली विमानतळाच्या सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार एअर ट्रॅफिक कंट्रोल ला या गोष्टीची माहिती मिळताच सुरक्षा कर्मचारी विमानतळावर येऊन विमानाचे दरवाजे उघडण्याचे वाट पाहू लागले.
मात्र पती-पत्नीमध्ये कशामुळे भांडण झाले आणि यांचा पत्ता याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. दोघांना या घटनेनंतर विमानात मधून उतरवण्यात आले की नाही याबाबत देखील माहिती कळाली नाही.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉
Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉
Join Now