सध्या भारतात सर्वत्र दिवाळी(Diwali 2023) उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. विश्वचषक 2023 (World Cup 2023)मध्ये व्यस्त असलेल्या टीम इंडियाने देखील वेळ काढत आज दिवाळी साजरी केली आहे. भारतीय संघामधल्या खेळाडूंनी बंगळुरुमध्ये कुटुंबियासोबत मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली. या दिवाळी साजरी करण्याचे सेलिब्रेशनचे सध्या फोटोज आणि व्हिडिओज सर्वत्र व्हायरल होत आहेत. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडल वरून या दिवाळी सेलिब्रेशन(Diwali Celebration video)चे खास व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.
टीम इंडियाची दिवाळी

दिवाळीच्या मुख्य दिवशी भारताला वर्ल्ड कप 2023 मधल्या साखळी फेरीतला शेवटचा सामना नेदरलँडच्या संघासोबत खेळायचा आहे. या सामन्या अगोदर टीम इंडियातील खेळाडूंनी दिवाळी साजरी केली आहे. टीम इंडियातील सर्व खेळाडू ट्रॅडिशनल लोक मध्ये व्हिडिओ मधून दिसत आहेत. विराट कोहली अनुष्का शर्मा सोबत रोहित शर्मा आपल्या पत्नीसोबत आणि मुली सोबत दिवाळीचे सेलिब्रेशन करताना दिसत आहे तर भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड हे देखील ह्या दिवाळी सेलिब्रेशन मध्ये सामील झाल्याचे दिसत आहेत. इंटरनेटवर व्हायरल झालेले फोटोज आणि व्हिडिओज पाहून टीम इंडियाचे चाहते खुश झाले आहेत. (क्रिकेटच्या ताज्या बातम्या)

भारत विरुद्ध नेदरलँड्स सामना आज

वर्ल्ड कप 2023 मध्ये भारताचा शेवटचा साखळी सामना नेदरलँड सोबत होणार आहे. आजचा सामना बंगलुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे आणि पॉईंट टेबल मध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे त्यासोबत सेमी फायनल तिकीट देखील कन्फर्म केल आहे. (आंतरराष्ट्रीय क्रिकेट) वर्ल्ड कपच्या सेमी फायनल च्या फेरीत आता न्यूझीलंड सोबत सामना होणार आहे. तर अजून नेदरलँड सोबतचा सामना शिल्लक असून भारतासमोर नेदरलँड चा आव्हान असणार आहे. 

वर्ल्ड कप मध्ये नेदरलँडच्या संघाला चांगली कामगिरी जरी करता आली नसली तरी त्यांनी मोठ्या संघांना हरवल आहे. भारत विरुद्ध नेदरलँड हा क्रिकेट सामना पहिल्यांदाच होणार आहे भारत ह्या अगोदर नेदरलँड सोबत एकदाही एक दिवसीय सामना खेळला नाही. नेदरलँडच्या संघानं या विश्वचषकामध्ये साऊथ आफ्रिका आणि बांगलादेश या संघांना हरवला आहे त्यामुळे हे आव्हान भारतीय संघ पूर्ण करतो का हे पाहायचं आहे. (ODI World Cup 2023)

टीम इंडियाचा दिवाळी सेलिब्रेशन करतांचा व्हिडिओ:

क्रिकेटच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा