ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही मार्केटमध्ये सध्या वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर्स चा पाऊस पडत आहे. रिलायन्स जिओ ने सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर समोर आणला आहे. (jio plan)
रिचार्ज प्लान च्या लिस्टमध्ये जिओनी एक नवा शानदार प्लॅन जोडला आहे. या प्लॅनमध्ये सध्या जिओ आपल्या ग्राहकांना 900 जीबी डेटा देत 23 दिवसांची अतिरिक्त वैधता देऊ करत आहे जिओकडून हे दिवाळीनिमित्त गिफ्ट देण्यात आले आहे.
Jio ₹ 2999 रिचार्ज प्लान
299 रुपयाचा रिलायन्स जिओचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन एका वर्षासाठी म्हणजेच 365 दिवसांसाठी वैधता देतो त्यामुळे आपल्याला दर दोन-तीन महिन्याला रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळते वर्षभर रिचार्ज करण्यासाठी त्रास घ्यावा लागत नाही याच प्लॅन सोबत 23 दिवसांची अतिरिक्त वैधता सुद्धा कंपनीकडून देण्यात येत आहे.
Reliance Jio च्या या प्लॅनमध्ये आपल्याला दररोज 2.5 जीबी डेटा देण्यात येत आहे या प्लॅनमध्ये दररोज 100 sms सोबत अनलिमिटेड कॉलिंग देण्यात येत आहे.
रिलायन्स जिओच्या या प्लॅनमधील इतर बेनिफिट बद्दल सांगायचं झाल्यास जिओ टीव्ही(jio tv), जिओ सिनेमा (jio cinema) आणि जिओ क्लाऊड चे सबस्क्रीप्शन यामध्ये मोफत देण्यात येत आहे. तसेच या प्लॅनमध्ये 900 जीबी चा डेटा मिळत असल्यामुळे आपल्याला जादा डेटा मिळतो. जर आपण 5g कनेक्टिव्हिटी असलेल्या भागांमध्ये असाल तर अनलिमिटेड jio 5g डेटा योजनेचा लाभ घेऊ शकता.
हा रिचार्ज कोठे कराल?
रिलायन्स जिओ कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं नाही की दिवाळी निमित्त रिचार्ज ऑफर फक्त माय जिओ ॲप वरच करू शकाल की इतर चा वापर करत या रिचार्ज चा वापर केल्यास बेनिफिट मिळू शकेल. कारण पेटीएम सारख्या प्लॅटफॉर्मवर हा रिचार्ज चा पर्याय आहे दिसत नाहीये. मात्र तुम्ही जिओ दिवाळी ऑफर माय जिओ(my jio) ॲपच्या माध्यमातून कॅशबॅक ऑफर्स जोडून जास्तीत जास्त फायदा करून घेऊ शकता.